काँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड

काँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड

कठुआच्या प्रकरणाच्या निषेधार्थ एनएनसयुआयची निषेध यात्रा निघाली होती. या मोर्च्यात महिला तसेच पुरूष कार्यकर्तेही सामील झाले होते

  • Share this:

19 एप्रिल: जम्मू काश्मिरमधील कठुआच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने मुंबईत निषेध मोर्चा काढला होता. या निषेध मोर्चात काँग्रेसच्या कार्यकर्तीचीच छेड काढण्यात आल्याचा आरोप तिने केला  आहे. जुहमध्ये घडलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

कठुआच्या प्रकरणाच्या निषेधार्थ एनएनसयुआयची निषेध यात्रा निघाली होती. या मोर्च्यात महिला तसेच पुरूष कार्यकर्तेही सामील झाले होते. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार काही तरूण कार्यकर्त्यांनी या यात्रेदरम्यान तिची छेड काढली आहे. तसंच अजूनही काही जणींसोबत असं झाल्याची सध्या चर्चा आहे.

या कार्यकर्तीने ही तक्रार मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्याकडे केली आहे. आरोपींना शिक्षा होईल असं आश्वासन पीडितेला देण्यात आलं आहे.

कठुआ, निर्भया प्रकरणावर अनेक घटना घडल्या की मोर्चे निघतात. पण अशा मोर्च्यांमध्येच मुलींची छेड काढली जात असेल तर मग अशी प्रकरण थांबणार कशी अशी शंका आल्याशिवाय राहत नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 05:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading