Home /News /mumbai /

मुंबईतील साकीनाका परिसरातील आग आटोक्यात, झोपड्या आणि गोदाम जळून खाक

मुंबईतील साकीनाका परिसरातील आग आटोक्यात, झोपड्या आणि गोदाम जळून खाक

आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 8 जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : मुंबईच्या (Mumbai) कुर्ला परिसरातील नेताजी नगर (Netajinagar, Kurla) भागात भीषण आग (Fire) लागली होती. या आगीत 7 ते 8 झोपड्या भक्षस्थानी सापडल्या आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल असून आग आटोक्यात आण्यात यश आले आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील   साकीनाका येथील 3 नंबर खाडी, कंकली चाळमध्ये सकाळी 8 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली होती. प्रथम एक प्लास्टिकच्या गोदामला आग लागली होती आणि ही आग आजू बाजूच्या झोपड्यांमध्ये पसरली. या घटनेत  सात ते आठ झोपड्या आणि गोदाम जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 8 जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.  परंतु, अतिशय अरुंद गल्याअसल्याने आगीपर्यंत पोहचण्यास अग्निशमन दलाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही. दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या दुर्घटनेत झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या