मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /11 कामगार दुकानात झोपले अन् अचानक उडाला आगीचा भडका, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

11 कामगार दुकानात झोपले अन् अचानक उडाला आगीचा भडका, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू


मुंबईतील साकीनामा परिसरात राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअरच्या दुकानाला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागली

मुंबईतील साकीनामा परिसरात राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअरच्या दुकानाला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागली

साकीनाका परिसरात एका हार्टवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च : मुंबईमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. साकीनाका परिसरात एका हार्टवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 9 कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या आगीत दुकान जळून खाक झालं आहे.

मुंबईतील साकीनामा परिसरात राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअरच्या दुकानाला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीच दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. राकेश गुप्ता (वय २२) आणि गणेश देवासी (वय २३) अशी मृतांची नाव आहे.

मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. या दुकानातच 11 कामगार झोपलेले होते. अचानक आगीच्या घटनेमुळे गोंधळ उडाला. शेजारी असलेल्या स्थानिकांनी तातडीने आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीच 11 कामगारांपैकी 2 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या मेहनतीनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.

First published:
top videos