मुंबई, 7 फेब्रुवारी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासावर निर्बंध लादण्यात आले होते. नंतर मात्र अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या काळातही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी झाली नाही आणि रेल्वेने दंड स्वरुपात तब्बल 4.95 कोटी रुपये वसूल केले आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 15 जून 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीच्या मोहीमा राबविल्या. या तपासणी दरम्यान 1.58 लाख प्रकरणे आढळून आली आणि त्यांच्या पासून 4.95 कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले.
त्यापैकी सुमारे 1.21 लाख प्रकरणे उपनगरी भागात आढळून आली ज्यात दंड म्हणून रु. 2.87 लाख वसूल केले आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील 37 हजार 823 प्रकरणांमधून 2.09 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आले.
हेही वाचा - मुंबईचा डॉन होण्यासाठी केला खतरनाक व्हिडिओ, मात्र पोलिसांनी वेळीच दिला दणका!
उपनगरी गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे जनरेट तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे ट्रान्सफर करण्यासारखी प्रकरणे आणि अन्य अनियमितता प्रामुख्याने या मोहिमेदरम्यान आढळून आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central railway, Mumbai