• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • संतापजनक! अभिनेत्रीला पाठवले अंडरगार्मेंट्स आणि Sex Toys, विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण

संतापजनक! अभिनेत्रीला पाठवले अंडरगार्मेंट्स आणि Sex Toys, विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण

 मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. वेगवेगळ्या शॉपिंग साईटवरून हे पार्सल अभिनेत्रीला पाठवण्यात आले होते.

मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. वेगवेगळ्या शॉपिंग साईटवरून हे पार्सल अभिनेत्रीला पाठवण्यात आले होते.

मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. वेगवेगळ्या शॉपिंग साईटवरून हे पार्सल अभिनेत्रीला पाठवण्यात आले होते.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : आपल्या लाडक्या अभिनेता आणि अभिनेत्रीची (actress ) एक झलक पाहण्यासाठी चाहते जीवाचे रान करत असतात. तासंतास त्यांच्या घराबाहेर ताटकाळत उभे राहत असतात. तर काही चाहते हे आपल्या अभिनेत्री आणि अभिनेत्याला भेट वस्तूही पाठवत असतात. पण, मुंबईतील (mumbai) एका 28 वर्षीय विकृत चाहत्याचा सामना करावा लागला आहे. या विकृताने अंडरगार्मेंट्स (Undergarments) आणि सेक्स टॉय (sex toy) पाठवल्याची घाणरेडी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari in Mumbai) राहणाऱ्या एका 28 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला या घाणरेड्या प्रकाराला सामना करावा लागला आहे. सुरुवातील हा कुणी तरी खोडसाळपणा केला असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण, त्यानंतर हा सत्र सुरू झालं. तब्बल आठ वेळा या विकृताने ही अंडरगार्मेंट्स  आणि सेक्स टॉय पाठवल्याचा प्रकार घडला आहे, असं वृत्त लेटस्टलीने दिले आहे. ब्रिटनकडून COVISHIELD ला मान्यता, मात्र प्रवाशांच्या अडचणी ‘जैसे थे’! अचानक आलेल्या या गिफ्टमुळे अभिनेत्री पुरती हादरून गेली. या विकृताला धडा शिकवण्यासाठी तिने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. अंबोली पोलीस स्टेशनमध्ये (amboli police station mumbai) या अभिनेत्रीने रितसर तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. या विकृताने आतापर्यंत आठवेळा या अभिनेत्रीच्या घरी गिफ्ट पाठवले असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. वेगवेगळ्या शॉपिंग साईटवरून हे पार्सल अभिनेत्रीला पाठवण्यात आले होते. वारंवार हा विकृती वेगवेगळ्या ठिकाणाहून या अभिनेत्रीला अंडरगार्मेंट्स आणि सेक्स टॉय पाठवले आहे. Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात काही फोन क्रमांक हाती लागले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच हा विकृत अटकेत असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीसोबत घडलेल्या या प्रकरणामुळे कला क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
  Published by:sachin Salve
  First published: