मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईच्या समुद्रात वादळ येणार माहित असून कॅप्टनने 261 जणांना अडवले, धक्कादायक माहितीसमोर

मुंबईच्या समुद्रात वादळ येणार माहित असून कॅप्टनने 261 जणांना अडवले, धक्कादायक माहितीसमोर

चक्रीवादळ सुरू असताना ज्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या ते खोल उधाणलेल्या समुद्रात भरकटत गेले

चक्रीवादळ सुरू असताना ज्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या ते खोल उधाणलेल्या समुद्रात भरकटत गेले

चक्रीवादळ सुरू असताना ज्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या ते खोल उधाणलेल्या समुद्रात भरकटत गेले

मुंबई, 20 मे: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P305 बार्ज होतं. या बार्जवर आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, समुद्रात तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) येणार याची पूर्व कल्पना असतानाही बार्ज P305 च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ONGC च्या तेल उत्खनंन प्रकल्पावर काम करण्याचं कंत्राट अॅफकॉन कंपनीकडे होतं. याच अॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले 261 कर्मचारी बार्ज P305 वर होते. बार्ज P305 समुद्रातच थांबण्याचे आदेश अँफकाँन कंपनीने दिल्यामुळेच कॅप्टनने चक्रीवादळातही बार्ज P305 भर समुद्रातच कार्यरत ठेवली. अँफकाँन कंपनी आणि बार्ज P305 चा कँप्टन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे

पती आणि मुलांसोबत झोपलेल्या महिलेवर बलात्कार, एका गैरसमजामुळे घडलं भलतंच

261 लोकांची जीव चक्रीवादळात सापडला. त्यापैकी 188 लोकांचा जीव नौदलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून वाचवला.

चक्रीवादळ सुरू असताना ज्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या ते खोल उधाणलेल्या समुद्रात भरकटत गेले. त्यांच्यापैकी 37 लोकांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागलेत. उर्वरीत 36 लोकांचा शोध आजही नौदल आणि तटरक्षक दलाच्या युद्धनौका आणि त्यावरील जवान घेत आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते त्यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने रेस्क्यू केलं आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन कर्मचाऱ्यांना वाचवलं आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

महिला क्रिकेटमधील महेंद्रसिंह धोनीनं न्यूड फोटो शेअर करत उडवली होती खळबळ

चारही बार्जवरुन नौदलाच्या टीमने आतापर्यंत 611 जणांना रेस्क्यू केलं आहे. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अद्यापही 38 कर्मचारी हे बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. खवळलेल्या समुद्रात बार्ज भरकटल्यानंतर घाबरलेल्या काही कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या घेतल्या आणि त्यानंतर खवळलेल्या समुद्रात त्यापैकी काहींनी आपले प्राण गमावले.

 ONGCने याकडे दुर्लक्ष का केले? नवाब मलिकांचा सवाल

दरम्यान, चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता शासकीय यंत्रणेणे खबरदारी म्हणून सुरक्षेच्या संदर्भात पूर्वतयारी केली होती. मात्र, या चक्रीवादळात खवळलेल्या समुद्रात चार बार्ज मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर भरकटले. या बार्जवर 700 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते. यापैकी 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याच प्रश्नावरुन नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ओएनजीसी (ONGC)वर गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केले आहेत.

बालकलाकार कसा झाला दक्षिणेचा सुपरस्टार? पाहा Junior NTR चा थक्क करणारा प्रवास

नवाब मलिक यांनी ट्विट्स करत म्हटलं, तौत्के चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबंधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे दुर्लक्ष का केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का नाही केले? असा सवाल करतानाच कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai