मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात मुंबईत तक्रार दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राविरोधात मुंबईत तक्रार दाखल

प्रत्येक मुलीसारखं माझंही एक स्वप्न होतं की कुणीतरी मला 'आयफेल टॉवर'च्या समोर प्रपोज केलं पाहिजे.

प्रत्येक मुलीसारखं माझंही एक स्वप्न होतं की कुणीतरी मला 'आयफेल टॉवर'च्या समोर प्रपोज केलं पाहिजे.

मुंबईत राहणारे NRI सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 5 मार्च : उद्योगपती राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईत राहणारे NRI सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. 2014 मध्ये झालेल्या एका प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली.

सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित प्रकरण हे प्रकरण आहे. 2014 ला तक्रारारदार आणि राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्यात देवाण-घेवाणीवर वाद झाला होता. याप्रकरणी NRI सचिन जोशी यांनी 15 दिवसांपूर्वी ही तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

शिल्पा शेट्टी आणि कुंद्रा याआधीही अनेकदा वादात

अभिनेत्री (Bollywood Actress) शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याआधीही अनेकदा वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत राज कुंद्रांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. ED ने त्यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. तेव्हा राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले होते.

हेही वाचा- पाकिस्तानी अभिनेत्रीनं भारतीय गाण्यावर केला भन्नाट डान्स, कारमधला डान्स VIDEO VIRAL

इक्बाल मिर्चीच्या संपत्तींचा व्यवहार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रणजीत सिंह बिंद्रा आणि कुंद्रा यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाला. मिर्चीच्या 225 कोटींच्या व्यवहाराप्रकरणी बिंद्राला अटक करण्यात आली होती. बिंद्राची रिअल इस्टेट कंपनी RKW डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इसेन्शल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड यांच्या आर्थिक व्यवहार झाले आहेत. इसेन्शल हॉस्पिटॅलिटीमध्ये शिल्पा शेट्टीही संचालक आहे.

First published:

Tags: Bollywood, Raj kundra, Shilpa shetty