S M L

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 11, 2018 10:11 PM IST

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चेसाठी  उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय

11 मार्च:  मुंबईत दाखल झालेल्या शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतलीय.  या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक उच्चस्तरीय समिती या विषयात लक्ष घालण्यासाठी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यात एकूण 6 मंत्री असतील. यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.

उद्या दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 10:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close