Home /News /mumbai /

जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी आली अंगाशी; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी आली अंगाशी; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी अंगलट; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी अंगलट; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल

Varsha Gaikwad and Aslam Shaikh in trouble : जाहीर कार्यक्रमात तलवार काढणं शिक्षणंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या अंगलट येताना दिसत आहे. कारण, या प्रकरणात आता दोन्ही मंत्र्यांवर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

    मुंबई, 28 मार्च : राज्याच्या शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) हे अडचणीत आले आहेत. जाहीर कार्यक्रमात तलवार काढल्याप्रकरणी दोन्ही मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? मुंबईत काही दिवसांपूर्वी एक जाहीर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मंचावर आपल्या हातात तलवार घेतली होती. या दोघांचे तलवारीसह फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर भाजपने या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्या विरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनीही तलवार नाचवली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल का नाही असा सवालही उपस्थित केला होता. तसेच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. वाचा : आघाडीत बिघाडीचे संकेत; शिवसेना आमदाराचे जाहीर कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेचे बाण, पाहा VIDEO नवाब मलिकांना अटक होताच मोहित कंबोजांनी नाचवली तलवार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना काल (23 फेब्रुवारी 2022) ईडीच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर अटक (Nawab Malik arrest by ED) केली. भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना अटक होताच भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष (BJP celebration after Nawab Malik arrest) केल्याचं पहायला मिळालं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहित कंबोज यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला तर यावेळी मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले. मात्र, ही तलवार नाचवणं मोहित कंबोज यांच्या अंगलट आली. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवाल नाचवली. याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai police, Varsha gaikwad

    पुढील बातम्या