मुंबई, 18 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सद्धा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहे. तर दुसरीकडे, त्यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर दुसरी पत्नी हॅमलीनच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी फरार आणि त्याची पत्न हॅमलीन विरोधात सुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हॅमलीनही फ्रांसची नागरिक आहे. कलम 420, 465, 468, 471, 34 IPC नुसार गुन्हा दाखल केला आहे.
(शिवसेनेच्या 'सामना'च्या पहिल्या पानावर झळकला पंतप्रधान मोदींचा फोटो, शिंदे-फडणवीसही दिसले!)
2 मार्च 2022 ते 23 जून 2022 दरम्यान कुर्ल्यामध्ये हे बनावट दस्तावज तयार केले आहे. त्यांच्यासह अन्य लोकांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
(शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश)
विशेष म्हणजे, फराजने जी कागदपत्र दिली होती, त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट बोगस असल्याचे समोर आले. Bmc चं विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झालं आहे. एक वर्षांपूर्वीच कुर्ला पोलिसांना पडताळणीसाठी हे Visa डिपार्टमेंट कडून पाठवण्यात आलं होतं. मात्र तब्बल एक वर्षांपासून कुर्ला पोलिसांकडून फाईलवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेरीस आता गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik