• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली

BREAKING : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली



गेल्या पाच-सहा महिन्यांपासून इथं उभं होती. या कारमध्ये स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, याबद्दल आपल्याला माहिती नाही

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून इथं उभं होती. या कारमध्ये स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, याबद्दल आपल्याला माहिती नाही

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून इथं उभं होती. या कारमध्ये स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, याबद्दल आपल्याला माहिती नाही

  • Share this:
    मुंबई, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण, मुंबईतील दहीसर पूर्व अशोक वन परिसरात आमदार प्रकाश सुर्वे (shivsena MLA Prakash Surve) यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तीची संशयास्पद कार सापडली आहे. या कारमध्ये फटाके आढळून आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर एक टाटा सुमो गाडी आढळून आली आहे. या गाडीमध्ये स्फोटकं असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळावर मुंबई पोलिसांचे BDD स्काँड दाखल झाले. IND vs ENG : इशांत शर्माने रचला विक्रम, कपिल-कुंबळेच्या लिस्टमध्ये पोहोचला उद्या १५ आँगस्ट स्वातंत्र दिनाचा मोठा सोहळा याच कार्यालया बाहेरील प्रांगणात होणार आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. गाडीची पाहणी केली असता स्फोटकांचे बॉक्स आढळून आले आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारची पाहणी केली असता बॉक्समध्ये फटाके असल्याचं समोर आलं. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, संपूर्ण कारमध्ये फटाकेचे बॉक्स कुणी ठेवले आणि ही गाडी प्रकाश सुर्वे कार्यालयाबाहेर का ठेवण्यात आली, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी गाडीतील सर्व कागदपत्र तपासून पाहिली, पण त्यावरून कुणाचीही ओळख पटली नाही. Explainer: तालिबानकडे युद्धासाठी एवढा पैसा येतो कुठून? कोण पुरवतंय रसद? 'गेल्या पाच-सहा दिवसांपासून गाडी इथं उभी होती. या कारमध्ये स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली, याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. जर नुसती कार सापडली असती तर समजू शकलो असतो पण स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आहे. उद्या स्वातंत्र्य दिन आहे, जर कुठे अनुचित प्रकार घडला असता तर त्याला कोण जबाबदार असतं, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी', अशी मागणी सुर्वे यांनी केली. दरम्यान, या गाडीमध्ये फटाके होते, गाडी कोणाची आहे आणि आमदारांच्या घराबाहेर सोडण्याचे कारण काय याचा तपास केला जातोय अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published: