आमदार अबू आझमी यांना महिलेशी हुज्जत घालणं भोवलं, मुंबई गुन्हा दाखल

आमदार अबू आझमी यांना महिलेशी हुज्जत घालणं भोवलं, मुंबई गुन्हा दाखल

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना महिला पोलिसांशी हुज्जत घालणं चांगलंच महागात पडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना महिला पोलिसांशी हुज्जत घालणं चांगलंच महागात पडलं आहे. आमदार अबू आझमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, आपत्ती कायदा आणि गर्दी जमवणे असे अनेक आरोप अबू आझमी यांच्यावर ठेवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा... भाजप नेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, दुर्गंधी पसरल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 27 मे रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर रेल्वेने गाड्याविषयी माहिती न दिल्याने हजारो लोक मुंबई रेल्वे स्टेशनबाहेर जमले होते. जवळपास 5-6 तास लोक आत जाण्याच्या प्रतिक्षेत थांबून होते. तर रेल्वे स्थानकाबाहेर वरीष्ठ पोलिस अधिकारी शालिनी शर्मा या तैनात होत्या.

शालिनी शर्मा यांनी रेल्वेने नेमकी कोणती गाडी कधी सुटेल याची माहिती दिलेली नाही. तोपर्यंत कोणाला आत सोडता येणार नाही, असे सांगितले. त्यात रेल्वेने गाड्या रद्द केल्याने पोलिसांनी सर्वांना घरी जाण्यास सांगितले. याच वेळेस त्या ठिकाणी आमदार अबू आझमी आले आणि त्यांनी शालिनी शर्मा यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जमावासमोर भाषण देखील केलं. यामुळे जमावाने पोलिसांविरोधात घोषणा बाजी देखील केली अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा.. डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

पोलिस उपायुक्तांनी दिलं स्पष्टीकरण...

आमदार अबू आझमी यांनी ज्या महिला वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. त्या पोलिस अधिकारी शालिनी शर्मा यांची या प्रकरणानंतर बदली करण्यात आली नसून ही एक सर्व सामान्य बदली असल्याचे पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

First published: May 29, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या