तसंच, रस्त्याच्या बांधकामात झालेली चूकही गडकरी यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही. तात्काळ दखल घेतली जाईल' असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केली होती. वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रा.मा.क्र.753 सी नागपूर ते औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे कामं बंद पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कंत्राटदाराला मारण्याची धमकी देऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 1 लाखात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 40000 हून अधिक नफा; पाहा डिटेल्स गडकरी यांनी वाशिममध्ये राष्ट्रीय मार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना अडथळा निर्माण करत आहे असे थेट पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. या पत्रानंतर शिवसेनेनं खुलासा केला होता. त्यानंतर हा वाद निवळला होता. आता राष्ट्रीय महामार्गातच भली मोठ चूक समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नितीन गडकरी यांना पत्र लिहणार आहे.पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत...माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही... तात्काळ दखल घेतली जाईल... pic.twitter.com/2Txjdc6hXa
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 19, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin gadkari, नितीन गडकरी, पंकजा मुंडे