मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनामुळे मुंबईत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

कोरोनामुळे मुंबईत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

80 टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी सदर रुग्णालयाद्वारे केली जात आहे.

मुंबई, 6 जून : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली. त्यानंतर आता या संकटावर उपाय म्हणून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोविड 19'ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, याकरिता राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा या महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयन देखील महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. तसेच या 80 टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी सदर रुग्णालयाद्वारे केली जात आहे. खासगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात; याकरिता सुयोग्य समन्वय साधण्यासाठी 5 सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाचे दायित्व देखील सोपविण्यात आले होते. मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील सेवा सुविधांच्या अधिक प्रभावी समन्वयासाठी वर्ष 2007 च्या तुकडीतील सनदी अधिकारी मदन नागरगोजे व अजित पाटील, वर्ष 2008 च्या तुकडीतील राधाकृष्णन, 2009 च्या तुकडीतील प्रशांत नारनवरे आणि वर्ष 2011 च्या तुकडीतील सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे. संबंधित सनदी अधिकाऱ्यांचा 'ईमेल आयडी' पुढीलप्रमाणे आहे : 1. मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, काॅनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास श्री. नागरगोजे यांचा ईमेल पत्ता पुढीलप्रमाणे आहे: covid19nodal1@mcgm.gov.in 2. अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी डी हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे. श्री. पाटील यांचा ईमेल पत्ता : covid19nodal2@mcgm.gov.in 3. राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ई-मेल :- covid19nodal5@mcgm.gov.in 4. सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एस आर व्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ई-मेल : covid19nodal4@mcgm.gov.in 5 . प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांविषयी काही तक्रार किंवा सुचना करावयाची असल्यास त्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे आहे :- covid19nodal3@mcgm.gov.in संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या