Home /News /mumbai /

मुंबईची लाईफलाईन पुन्हा धावणार? लोकल सुरू करण्याबात मोठा निर्णय होणार

मुंबईची लाईफलाईन पुन्हा धावणार? लोकल सुरू करण्याबात मोठा निर्णय होणार

लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

    राधिका रामास्वामी,मुंबई, 14 जून : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कधीही न थांबणारी मुंबई शांत झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मायानगरी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारने तशी केंद्र सरकारकडे मागणीही केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी लोकल सुरू व्हावी, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सेवा कशी उपयुक्त आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली. हेही वाचा - येत्या 24 तासांत मुंबई-पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकल सेवा सुरू करण्याबाबतची आपली भूमिका याआधीच केंद्र सरकारला कळवली आहे. रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या याबाबत चर्चा सुरू असून लोकल सेवा सुरू केली तर ती कोणत्या स्वरूपात असावी याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई लोकल पुन्हा सुरू झाल्यास अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुणाला आणि कसा मिळू शकतो प्रवेश? देशभरात सुरू करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनचा पॅटर्न लोकल ट्रेनसाठी वापरण्याचा विचार पश्चिम आणि मध्य रेल्वेचा सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात येऊ शकते. या सर्वांना विशेष पास सोबत घेऊनच प्रवास करता येईल. जे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचारी लोकलमधून प्रवास करणार आहेत त्यांच्या नावांची यादी रेल्वेकडे दिली जाईल. या कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. हा पास दाखवूनच या कर्मचारी अथवा कोरोना योद्धांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. उपनगरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय बसच्या प्रवासात खूप वेळ जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच प्रवाशांच्या संख्येनुसार लोकलची संख्या ठरवण्यात येईल, अशी माहिती आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Lockdown, Mumbai local

    पुढील बातम्या