Home /News /mumbai /

मुंबईतील या 6 वर्षीय मुलीने जे केलं ते कळाल्यावर तुम्हीही तिला सलाम कराल!

मुंबईतील या 6 वर्षीय मुलीने जे केलं ते कळाल्यावर तुम्हीही तिला सलाम कराल!

लहान मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टीविषयी, प्रत्येक वस्तूविषयी आकर्षण असतं.

मुंबई, 19 डिसेंबर : लहान मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टीविषयी खूप आकर्षण आणि जवळीकता असते. मग ती खेळण्यातली बाहुली असो किंवा स्वतःचे कपडे. स्वतः चे दिसणे असो किंवा एखादं गोष्टीचं पुस्तक. आपली वस्तू किंवा आपली इतर कोणतीही गोष्ट मुलं सहजासहजी द्यायला तयार होत नाहीत. पण मुंबईतल्या एका चिमुरडीने चक्क सौंदर्याचा दागिना म्हणून ओळखले जाणारे आपले केस दान केले आहेत. टीया कोस्टा ही अवघ्या 6 वर्षांची मुलगी आहे. इतर लहान मुलांप्रमाणे ती सुद्धा अगदी निरागस पण तितकीच खोडकर आहे. लहान मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टीविषयी प्रत्येक वस्तूविषयी आकर्षण असतंच. सहजासहजी ते कुठली वस्तू द्यायला तयार होत नाही. त्याचप्रमाणे टियाला सुद्धा तिचे केस खूप आवडतात. तिच्या केसांबद्दल ती खूपच संवेदनशील आहे. पण तरीसुद्धा टीयाने आपले गुडघ्यापर्यंतचे केस नुकतेच कापले आणि ते केस दान केले आहेत. मुख्य म्हणजे त्याचा तिला आभिमन वाटतो. हे वाचा-VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावर घाटात तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली कार काही दिवसांपूर्वी टियाच्या आईच्या इंस्टाग्राम पोस्टवर तिने एका मुलीचा व्हिडिओ पाहिला जिने आपले केस दान केले होते. तेव्हा तिला प्रश्न पडला की या मुलीने आपले केस का कापले असतील. तेव्हा आईने टियाला त्यामागची पार्श्वभूमी सांगितली आणि कॅन्सर रुग्णांना केसांची किती गरज असते हेही सांगितले. हे ऐकून टियालासुद्धा आपले केस दान करण्याची इच्छा झाली. तसं तिने आईला बोलून दाखवलं आणि मग प्रेमाचा संदेश देणाऱ्या ख्रिसमसच्या निमित्ताने टियाने जिवापाड प्रेम असलेले आपले केस कापून घेतले, असं तिची आई शारमाईन कोस्टा यांनी सांगितलं. लहान मुलं अगदी निरागस असतात. आपण त्यांना जशी सवय लावू तशी ते लावून घेतात. टियाला इतक्या लहानपणी दान करण्याचं महत्त्व कळाले. सोबतच इतरांच्या वेदना समजून घेण्याचा मनाचा मोठेपणा सुद्धा तिने दाखवला आहे. टियाच्या या गोष्टीचं आता सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Cancer, Mumbai

पुढील बातम्या