Home /News /mumbai /

आईच्या हाय हिल्स सँडलने घेतला ६ महिन्याच्या बाळाचा बळी

आईच्या हाय हिल्स सँडलने घेतला ६ महिन्याच्या बाळाचा बळी

हाय हिल्सच्या सँडलमुळे आईच्या हातून पडून ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना कल्याणमध्ये घडली आहे.

07 मे : हाय हिल्सच्या सँडलमुळे आईच्या हातून पडून ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणच्या पश्चिम भागातील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. एका कार्यालयात एका लग्न सोहळ्यासाठी उल्हासनगरला राहणाऱ्या फैमिदा हमीद शेख या आपल्या मोहम्मद हमीद शेख या ६ महिन्यांच्या बाळाला घेऊन आल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर घरी परतण्यासाठी ते खाली उतरत होत्या. मात्र अचानक हाय हिल्सच्या सँडलमुळे त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या हातातून चिमुकला मोहम्मद थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. मोहम्मदला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण हा आघाेत त्या चुमकल्याला सहन झाला नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराबाबत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
First published:

Tags: Kalyan, कल्याण, बाळ, मृत्यू

पुढील बातम्या