मुंबईत येणाऱ्या सर्वांना आता 14 दिवस घरातच व्हावं लागेल क्वारंटाइन, BMCने काढले नवे आदेश

मुंबईत येणाऱ्या सर्वांना आता 14 दिवस घरातच व्हावं लागेल क्वारंटाइन, BMCने काढले नवे आदेश

शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई 7 ऑगस्ट: मुंबईत येणाऱ्या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणाऱ्या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावं लागणार आहे. मुंबई महानगर पालिकेने (BMC) हे नवे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.

ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने या गाईड लाईन्स जाही केल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. 1 सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने या शाळा सुरु होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका बैठकीत या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचे संकेत दिले. Unlock-3ची मुदत 31 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नव्या गाईड लाईन्समध्ये यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! साखर झोपेत असताना सापानं केला दंश, 3 भावांचा मृत्यू

Unlockच्या प्रक्रियेनुसार सर्व व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सरकारने योजना आणखी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होऊ शकतात. त्यात 10 ते 12वीच्या वर्गांना परवानगी दिली जाऊ शकते. नंतर क्रमाने विद्यार्थ्यांना बोलावलं जाऊ शकते. त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याची नियमावली शाळांना दिली जाणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 7, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading