वसई, 21 फेब्रुवारी : आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असताना वसईमध्ये मात्र महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. वसईतील तुंगारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या यात्रेला जाणाऱ्या एका 10 वर्षाच्या मुलीची छेड नराधमाने छेड काढली. या प्रकारानंतर संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीची तरुणाकडून छेड काढण्यात आली. हे मंदिर परिसरात असलेल्या इतर भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी नराधमाला धरलं आणि बेदम चोप दिला. त्यानंतर त्याची धिंड काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला कोणत्याही ठिकाणी सुरक्षित नाही हेच दिसून आलं. पण आता मंदिरासारख्या श्रद्धेच्या ठिकाणीही असे प्रकार घडल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इतर बातम्या - Maha Shivaratri 2020: महाशिवरात्र...महत्त्व आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त
खरंतर आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणाच गर्दी केली आहे. त्यामुळे चोऱ्या, हाणामाऱ्या आणि छेडखानीच्या प्रकारांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.