धक्कादायक : मुंबईत दहा वर्षांची मुलगी बनली आई

धक्कादायक : मुंबईत दहा वर्षांची मुलगी बनली आई

काही दिवसांनी ती चिमुकली गर्भवती राहिली. हे जेव्हा त्या सावत्र आईला कळालं तेव्हा तिने त्या चिमुकलीला घरातून हाकलून दिलं.

  • Share this:

मुंबई 26 जुलै : मुंबईतला कामाठीपुरा देशभर कुख्यात आहे. याच कामाठीपुऱ्यातली एक 10 वर्षांची मुलगी आई झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या मुलीची आई सावत्र असूनच तीनेच या चिमुकलीला वेश्याव्यवसायात ढकललं होतं. त्यातूनच ती गर्भवती राहिली. नंतर सावत्र आईने तिची घरातून हकालपट्टी केली. एका रेल्वे स्टेशनजवळ सामाजिक कार्यकर्त्यांना ती आढळून आली आणि पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. माणूसकीला काळीमा फासणारी या चिमुकलीची सगळी कहाणीच मन हेलावून टाकणारी आहे.

गर्दीचा आणखी एक बळी.. डोंबिवलीत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

ही मुलगी पश्चिम बंगालमध्ये राहणारी आहे. वर्षभरापूर्वी तिच्या आईचं निधन झालं. नंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुर्दैवाने काही वर्षांनी तिच्या वडिलांचं निधन झालं. नंतर तिची सावत्र आई मुंबईत आली कामाठीपुऱ्यात दलालांच्या तावडीत सापडली. भाड्याने रुम देण्याचं अमिष दाखवून एका दलालाने तिला आपल्या घरात घेतलं आणि नंतर त्या नराधमाने या 10 वर्षींच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली.

पैशाच्या लालसेने त्या सावत्र आईने त्या चिमुकलीला त्या नराधमाच्या हवाली केलं. नंतर इतरही लोक येऊन आपली भूक भागवू लागले. ही मुलगी जेव्हा या गोष्टीसाठी विरोध करत असे त्यावेळी ही सावत्र आई तिच्या शरीरावर चटके देत असे. काही दिवसांनी ती चिमुकली गर्भवती राहिली. हे जेव्हा त्या सावत्र आईला कळालं तेव्हा तिने त्या चिमुकलीला घरातून हाकलून दिलं.

मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन, 180 जादा बसेस धावणार

गर्भावस्था म्हणजे काय असतं हेही त्या चिमुकलीला माहित नव्हतं. अशा अवस्थेत ती मध्य रेल्वेच्या एका स्टेशनवर भीक मागून काही दिवस पोट भरत होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांना या मुलीची असाहाय स्थिती लक्षात आली. त्यांनी जेव्हा तिची आस्थेने चौकशी केली तेव्हा त्यांना त्या मुलीने आपली सर्व करुण कहाणी सांगितली. वैद्यकीय तपासणीनंतर ती नऊ महिन्याची गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं.

VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद

त्यानंतर त्या सामाजिका कार्यकर्त्यांनी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि मुलीला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केला. त्यानंतर तीने एका मुलाला जन्म दिला. आता दोघांचीही प्रकृती चांगली आहे. मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कामाठीपुऱ्यातून तिच्या सावत्र आईला आणि त्या दलालाला अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या