Home /News /mumbai /

Navi Mumbai News: 80 वर्षीय वृद्धाचे कारनामे, 10 हजार देऊन तरुणाच्या पत्नीसोबत झोपण्याची केलेली मागणी

Navi Mumbai News: 80 वर्षीय वृद्धाचे कारनामे, 10 हजार देऊन तरुणाच्या पत्नीसोबत झोपण्याची केलेली मागणी

29 ऑगस्टला वृद्ध नाईकनं युवकाला 10 हजार रुपये देऊ करत त्याच्या पत्नीला गोडाऊनमध्ये पाठवण्यास सांगितलं. या मागणीमुळे संतापलेल्या आरोपीनं वृद्धाला ढकलून दिलं.

  मुंबई, 07 सप्टेंबर : नवी मुंबईत एका 80 वर्षीय वृद्धाच्या हत्येचं (80 year old murdered) प्रकरण समोर आलं आहे. एका 33 वर्षीय व्यक्तीवर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. या वृद्धानं कथितरित्या 10 हजार रुपयांच्या बदल्यात तरुणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असं सांगितलं जात आहे. या मागणीमुळं संतापलेल्या तरुणानं रागाच्या भरात त्या वृद्धाला ढकलून दिलं आणि नंतर ठार केलं, असं प्राथमिक चौकशीत समोर आलंय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या हवाल्यानं हिंदुस्तान टाइम्स या घटनेचं वृत्त दिलंय. शमाकांत तुकाराम नाईक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्तीच्या नावावर दुकाने, फ्लॅट आणि प्लॉटसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मृत वृद्ध नाईक 33 वर्षीय आरोपीच्या दुकानात अनेक वेळा जात असे. तसंच एकदा त्यानं 5 हजार रुपयांच्या मोबदल्यात तरुणाकडे त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असं वृत्त आहे. पोलिसांनी माहिती दिली की, अशाच प्रकारे 29 ऑगस्टला वृद्ध नाईकनं युवकाला 10 हजार रुपये देऊ करत त्याच्या पत्नीला गोडाऊनमध्ये पाठवण्यास सांगितलं. या मागणीमुळे संतापलेल्या आरोपीनं वृद्धाला ढकलून दिलं. यामुळे तो पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. आरोपीनं तत्काळ दुकानाचे शटर खाली पाडले आणि नाईकचा गळा दाबून खून केला. यानंतर त्यानं बाथरूममध्ये मृतदेह लपवून ठेवला. 31 ऑगस्टपर्यंत नाईकचा मृतदेह शौचालयात राहिला. पहाटे 5 वाजता आरोपीनं नाईकचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला आणि तो दुचाकीवर घेऊन तलावामध्ये फेकण्यासाठी निघाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपीनं दिलेल्या निवेदनात सांगितलंय की, त्यानं मृत व्यक्तीचे कपडे आणि मोबाईल कचराकुंडीत फेकून दिले. या वस्तू अद्याप सापडलेल्या नाहीत. हे वाचा - नवीन दुचाकी खरेदी करुन घरी परतणाऱ्या डॉक्टरवर सपासप वार, दोघांना अटक याव्यतिरिक्त आरोपी 80 वर्षीय वृद्ध नाईक याच्या मुलासह 29 ऑगस्टला त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेला होता. नाईकच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, ते 29 ऑगस्टला घरातून निघाले होते आणि परत आले नाहीत. त्याचा मोबाईल फोन बंद होता. संपत्तीमुळे वृद्धाची हत्या झाल्याचा पोलिसांना सुरुवातीला संशय होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते दुकान चालवणाऱ्या तरुणापर्यंत पोहोचले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Mumbai

  पुढील बातम्या