आई अंगणात महिलांशी मारत होती गप्पा, घरात 8 वर्षीच्या बालिकेवर बलात्कार

आई अंगणात महिलांशी मारत होती गप्पा, घरात 8 वर्षीच्या बालिकेवर बलात्कार

मुंबके येथील मुस्लिम मोहल्ल्यात ही घटना घडली

  • Share this:

चंद्रकांत बनकर,(प्रतिनिधी)

खेड,5 डिसेंबर: हैदराबादेत डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटनेने हाहाकार उडाला असताना खेड तालुक्यात 8 वर्षीच्या बालिकेवर बलात्कार झाला आहे. मुंबके येथील मुस्लिम मोहल्ल्यात ही घटना घडली आहे. आरोपी रुपेश जनार्धन जाधव (वय-40) असे नराधमाचे नाव असून खेड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनंतर खेडसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आई अंगणात महिलांशी मारत होती गप्पा...

पीडित बालिकेची आई अंगणात महिलांशी गप्पा मारत होती. तर पीडित बालिका अंगणात खेळत होती. आरोपी रुपेश जाधव याने बालिकेला घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर भादंवि कलम 354,323,376,511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबरला सायंकाळी साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित बालिकेच्या आईने खेड पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पीडितेची आई घराच्या अंगणात इतर महिलांशी गप्पा मारत बसली होती. आरोपी रुपेश जाधव याने बालिकेला नकळत घरात नेऊन तिला मारहाण केली. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केली. या घटनेनंतर खेडसह रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बलात्कार प्रकरणातील पीडितेला नराधमांनी जिवंत पेटवले

दुसकीकडे, मानवतेला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे घडली आहे. जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला गुरुवारी सकाळी जिवंत पेटवले. पीडिता 90 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला तातडीने उपचारासाठी लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे उन्नाव पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना आहे. पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी ती पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडिता गंभीर भाजली गेली आहे. पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान शुभम आणि शिवम बलात्कार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते.

डिसेंबर 2018 मध्ये झाला होता सामुहिक बलात्कार..

दरम्यान, 12 डिसेंबर 2018 रोजी शिवम आणि त्याचा मित्र शुभम त्रिवेदी लग्न करण्याच्या बहाण्याने मंदिरात घेऊन पीडितेवर सामुहिक बलात्कार केला होता. बिहार पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी शिवम आणि शुभम त्रिवेदला अटक करून तुरुंगात डांबले होते.

शिवमसोबत होते प्रेमसंबंध..

पीडितेचे गावातील शिवम त्रिवेदी याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. शिवमने रायबरेली येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने रायबरेली येथे एका खोली बंद केले होते.

First published: December 5, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading