मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ताज हॉटेलला 8.50 कोटींचा शुल्क माफ, भाजपने घेतला आक्षेप

ताज हॉटेलला 8.50 कोटींचा शुल्क माफ, भाजपने घेतला आक्षेप

मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी  26/11 च्या हल्ल्याच्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गेली 12 वर्षे हॉटेल भोवतीचा फूटपाथ आणि रस्त्याचा काही भाग ताज हॉटेल वापरत आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील ताज हॉटेलवर (taj hotel mumbai) मुंबई महापालिका प्रशासन (mumbai municipal corporation) आणि सत्ताधारी शिवसेना (Shivsena) भलतीच मेहेरबान झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. ताज हॉटेल भोवती असलेल्या फुटपाथचा थकीत 8.50 कोटीचे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मुंबई पालिकेनं मंजूर केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप घेतला आहे. मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी  26/11 च्या हल्ल्याच्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गेली 12 वर्षे हॉटेल भोवतीचा फूटपाथ आणि रस्त्याचा काही भाग ताज हॉटेल वापरत आहे. या रस्ता आणि फूटपाथ वापराबद्दलचे सुमारे 8.5 कोटी रुपयांचे थकीत शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. ...आणि सुमुद्राने गिळली मारुती स्विफ्ट कार, तरुण-तरुणीला मस्ती पडली भारी, VIDEO तसंच यापुढील काळात फूटपाथ वापराचे 100 टक्के आणि रस्ता वापराचे 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. रस्त्याची 869 चौरस मिटरची जागा आणि पदपथाची 1136.3 चौरस मिटरची जागा ताज हॉटेलनं बॅरिकेडस टाकून अडवली आहे. स्थायी समितीत या प्रस्तावाला भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं विरोध करत यावर बोलण्याची मागणी केली. परंतु, स्थायी समिती अध्यक्षांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावत हा प्रस्ताव पास केला. एकीकडे सामान्य जनतेला एक पैशाचीही शुल्कमाफी मिळत नसताना दुसरीकडे फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताजला मात्र कोट्यवधींची शुल्कमाफी मिळत असल्याच्या कारणावरून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन पालिकेनं केल्यानं लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचे काँग्रेसनं स्पष्ट केलं. शाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश वादात तर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीनं सुरक्षेच्या कारणास्तव योजलेल्या उपायांसाठी रस्ता आणि फूटपाथ वापरला जात असल्याने शुल्क माफ केल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेनं दिले आहे.
First published:

पुढील बातम्या