News18 Lokmat

सातवा वेतन आयोग लागू न केल्यास कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

शेतकरी कर्जमाफीनंतर आता सरकारसमोर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचं आव्हान...

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2017 02:21 PM IST

सातवा वेतन आयोग लागू न केल्यास कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

13 जून : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सुटतो ना सुटतो तोच राज्य सरकारपुढे आता सरकारी कर्मचाऱ्यांनी आव्हान उभं केलं आहे. खरंतर शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारा पैसा नेमका कुठून आणि कसा उपलब्ध करायचा हा प्रश्न सरकारसमोर उभा असतानाच आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनीही सातव्या वेतन आयोगासाठीच्या अंमलबजावणीसाठीही तगादा लावला आहे. राज्याच्या 19 लाख कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ ताबडतोब लागू करा, अन्यथा सरकारी कर्मचारी 12 जुलैपासून तीन दिवसांचा संप करतील, असा इशारा संबंधित संघटनांनी दिला आहे.

राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आता सरकार पेचात येण्याची दाट शक्यता आहे. कारण 19 लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचं नवं संकट सरकारसमोर उभा आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून सातवा वेतन आयोग लागू झाल्याने राज्यातही तातडीनं लागू करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांनी उचलून धरली आहे. नाहीतर 12 जुलैपासून 3 दिवसांचा संप करण्याचा इशारा सरकारी कर्मचारी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न सरकार नेमकं कसं सोडवणार हे मोठं कोडं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2017 02:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...