S M L

मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महानगरात 791 इमारती धोकादायक

बीएमसीनेच यासंबंधीची आकडेवारी जाहीर केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 25, 2017 03:19 PM IST

मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महानगरात 791 इमारती धोकादायक

मुंबई, 25 जुलै : घाटकोपरमध्ये साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्यानंतर  मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साई दर्शनच्या दुर्घटनेत 7 लोक मृत्यूमुखी पडले .मुंबईत अशी एकच नाही तर  एकूण 791  इमारती राहण्यासाठी धोकादायक आहेत. बीएमसीनेच यासंबंधीची आकडेवारी जाहीर केलीय.

मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतींची एक यादी तयार केली होती. त्यात C-1 कॅटेगरीमध्ये 791 इमारती होत्या. अत्यंत धोकादायक इमारतींना C-1 कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. मार्च अखेरीस या 791 पैकी 186 इमारती पाडण्यात आल्या तर 117 इमारती रिकाम्या करण्यात आल्या. इमारतीला धोकादायक जाहीर करण्याआधी महापालिकेचे अधिकारी त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करतात. त्यानंतर ती इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली जाते. पालिकेकडून अशा धोकादायक इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो तसंच पाणीपुरवठा तोडला जातो. महापालिकेच्या C-2 आणि C-3 कॅटेगरीमध्येही काही इमारती असतात. C-2 यादीत ज्या इमारती येतात त्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते. C-3 इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते.

मुंबई महापालिका कायदा 1888 अंतर्गत पालिकेकडून नोटीस बजावली जाते. सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात. हा कायदा बीएमसी प्रशासनाला इमारत रिकामी करण्याचा अधिकार देतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close