कल्याणमध्ये 7 नक्षलवाद्यांना अटक; एटीएसची मोठी कारवाई

कल्याणमध्ये 7 नक्षलवाद्यांना अटक; एटीएसची मोठी कारवाई

कल्याणमध्ये नक्षली संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. हे 7 जण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

13 जानेवारी : कल्याणमध्ये नक्षली संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. हे 7 जण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या या 7 जणांचा कोरेगाव-भीमा हिंसाचार व महाराष्ट्र बंदमध्ये हात असल्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

या सर्वांकडे आक्षेपार्ह लिटरेचर आणि काही बॅनर आढळून आले आहेत. कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी राज्यात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसानही करण्यात आलं होतं. अनेक खासगी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. या सर्व घटनांमध्ये या संघटनेचा किंवा या 7 जणांचा हात होता का? याचा तपास आता एटीएसकडून केला जात आहे.

कल्याण स्टेशनला हे संशयित येत असल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली. एटीएसने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही. सविस्तर चौकशीनंतर या संशयितांनी सर्व बाबींचा खुलासा केला आहे. कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी भागात राहणारे आपले सहकारी सीपीआय (माओ) बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याचं या संशयितांनी सांगितलं आहे. त्यानंतर एटीएसने सर्व ठिकाणी शोध घेत एकूण सात जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सीपीआय (माओ) संघटनेशी संबंधित कागदपत्रंही मिळाली आहेत. या सगळ्यामुळे अनेक बाबींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 09:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading