मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ट्रकला भीषण आग लागल्यानंतर एकापाठोपाठ 7 सिलेंडरचा भीषण स्फोट, LIVE VIDEO

ट्रकला भीषण आग लागल्यानंतर एकापाठोपाठ 7 सिलेंडरचा भीषण स्फोट, LIVE VIDEO

सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला होता. जवळपास दीड तास सिलेंडर स्फोटाची मालिका सुरू होती.

सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला होता. जवळपास दीड तास सिलेंडर स्फोटाची मालिका सुरू होती.

सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला होता. जवळपास दीड तास सिलेंडर स्फोटाची मालिका सुरू होती.

मुंबई, 08 फेब्रुवारी : मुंबईजवळील (Mumbai) मीरा रोड  परिसरात (Mira road) एका मोकळ्या मैदानात गॅस सिलेंडरने (Gas cylinder) भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली होती. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ 7 सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas cylinder blast) झाला. या आगीत ट्रॅकचा जळून कोळसा झाला आहे. या सिलेंडर स्फोटाचे व्हिडीओ समोर आली आहे.

मीरा रोड भागातील मोकळ्या परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उभा होता. पहाटे 2 वाजेच्या सुमारास अचानक या ट्रकला आग लागली. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पण तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा असल्यामुळे खबरदारी घेतली जात होती. सुदैवाने हा ट्रक मोकळ्या मैदानात उभा होता. त्यानंतर एकापाठोपाठ आगीत सात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर दणाणून गेला होता. जवळपास दीड तास सिलेंडर स्फोटाची मालिका सुरू होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपूरकरांचा ऑन द स्पॉट फैसला, दगडाने ठेचून गुंडाला संपवलं

एलपीजी सिलेंडर असलेल्या ट्रकला आग लागली की लावली गेली, या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही व्हिडीओ तपासले जात आहे.

एलपीजी सिलेंडर असलेल्या या ट्रकला जाणूनबुघून कुणी आग तर लावली नाही ना, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  पोलीस सर्व बाजूने या घटनेचा तपास करत आहे. या आगीत ट्रकचा जळून फक्त सांगाडा उरला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

First published: