मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /6 जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा होणार

6 जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा होणार

 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून) हा संपूर्ण राज्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, 3 जून : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून) हा संपूर्ण राज्यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय  ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा सरकारी जीआर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे सुपुर्द केलाय. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली.

शिवराज्याभिषेक दिवस राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये शिवराज्यदिन म्हणून साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे सुपुर्द केला, असे ट्विट सामंत यांनी केलं आहे.

6 जून म्हणजे शिवराज्यभिषेक दिन. या दिनालाच राज्य शासनानं ‘शिवस्वराज्य दिन’ असं नाव देवून या वर्षीपासून शासकीय कार्यालयात हा दिवस राज्यभर साजरा करण्याचं परिपत्रक काढलं आहे.

६ जून हा दिवस सर्व महाविद्यालये, विद्यापीठात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या जीआरची प्रत मी संभाजीराजे यांनी दिली. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, त्यांना या निर्णयाची माहिती दिली, असे उदय सामंत यांनी सांगितले.

शिवस्वराज्य दिनाबद्दल उदय सामंतांनी जो जीआर काढलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण होण्याचा हा पहिला टप्पा आहे. शाळांमध्ये देखील अशाच प्रकारे शिवस्वराज्य दिन साजरा व्हावा, असे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

यावर्षी शासन पातळीवर राज्यभर ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Maharashtra