Home /News /mumbai /

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या कार्यालयात कोरोनाचा उद्रेक, व्हावे लागले क्वारंटाइन

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या कार्यालयात कोरोनाचा उद्रेक, व्हावे लागले क्वारंटाइन

मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

    मुंबई, 12 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान मांडले आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी आणि दिग्गजांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातच सहा अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन, अवघ्या 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. याआधीही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती.  दोन्ही नेत्यांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत ठाणे, जुन्नर आणि पुण्यात राष्ट्रवादी नेते, नगरसेवकांना कोरोनाची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाखांवर दरम्यान, राज्यात गेल्या शुक्रवारपर्यंत तब्बल 24 हजार 886 रूग्ण आढळले आहे. त्यामुळे रूग्णांची एकूण संख्या ही 10 लाख 15 हजार 681 एवढी झाली आहे. दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात 14804 जणांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.83वर गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 566 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या 24 तासांत 97 हजार पॉझिटिव्ह तर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विकेण्डला धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत देशात तब्बल 97 हजार 570 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर पोहोचली आहे. SSR Death Case : NCB ची मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यात मारले छापे देशात 9 लाख 58 हजार 316 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा देशातील आकडा 46 लाखावर पोहोचला आहे. कोरोनाममुळे गेल्या 24 तासांत 1 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 77,472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 लाख 24 हजार 197 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: NCP, छगन भुजबळ, भुजबळ

    पुढील बातम्या