धक्कादायक; बोगस डॉक्टर 4 वर्षापासून करत होते उपचार

धक्कादायक; बोगस डॉक्टर 4 वर्षापासून करत होते उपचार

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तब्बल 57 बोगस डॉक्टरांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

  • Share this:

मुंबई, 9 फेब्रुवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तब्बल 57 बोगस डॉक्टरांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे मागील 4 वर्षापासून हे डॉक्टर प्रॅक्टिस अर्थात रूग्णांवर उपचार करत होते. महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिलमध्ये नाव रजिस्ट्रेशन करण्यासाठी या बोगस डॉक्टरांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री देखील मिळवली असल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर येत आहे. या साऱ्या प्रकारनंतर या डॉक्टरांचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.

एकाच बॅचचे 57 बोगस डॉक्टर

या बोगस डॉक्टरांनी मुंबईतील फिजिशियन आणि सर्जन या कॉलेजमधून 2014-15 साली डिग्री मिळवली होती. त्यानंतर या डॉक्टरांविरोधात ऑक्टोबर 2018साली गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी फिजिशियन आणि सर्जन कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला देखील अटक करण्यात आली आहे. जो विद्यार्थ्यांना बोगस डिग्री मिळवून देण्यामध्ये मदत करत होता. सीपीएस कॉलेजच्या नावाखाली डॉ. स्नेहल न्याती या प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 ते 5 लाख रूपये घेत होत्या. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना नापास झाल्यानंतर देखील बोगस डिग्री दिली जात होती.

मेडिकल काऊंन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन

दरम्यान, या बोगस डिग्रीच्या जोरावर काही विद्यार्थ्यांनी मेडिकल काऊंन्सिलमध्ये रजिस्ट्रेशनकरता अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे. अशी माहिती देखील आता पोलीस तपासातून पुढे येत आहे. बोगस डॉक्टरांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोण - कोण सहभागी आहे? त्याची पाळमुळं कुठंपर्यंत पोहोचली आहेत? याची सखोल चौकशी देखील आता पोलीस करत आहेत.

2016 साली घोटाळा आला होता समोर

2016 साली सीपीएस कॉलेजचा घोटाळा समोर आला होता. जळगाव पोलीस ठाण्यामध्ये एक निनावी पत्र आलं होतं. ज्यामध्ये सीपीएस कॉलेजच्या डिग्रीबाबत सत्यता जाणून घ्या असं सांगण्यात आलं होतं. या साऱ्या प्रकारनंतर कॉलेजनं अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं गेलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

Special Report: एक बंगला बने न्यारा, कसा असेल महापौरांचा नवा बंगला?

First published: February 9, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading