मुंबई, 26 मे: मुंबईत आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (cyclone Tauktae) तडाखा अनेक ठिकाणी बसला. तौक्ते वादळामुळे शहरात मोठं नुकसान झालं. या चक्रीवादळात मुंबई शहरातील अनेकं झाडं कोसळली. त्यात वांद्रे येथे 50 वर्ष जुनं झाडंही कोसळलं. वांद्रे 15 वा रोड येथील एक 50 वर्ष जुनं वटवृक्ष (banyan tree) होतं. गेल्या आठवड्यात चक्रीवादळात हे झाडं मुळासकट उन्मळून पडलं. मात्र या वटवृक्षाला नवं घर मिळालं आहे. हे झाडं वांद्रे प्रोमेनेड (Bandra Promenade)वर पुन्हा लावण्यात येणार आहे.
स्थानिक परिस्थितीमुळे हे झाडं त्याच्या मूळ जागी लावणं अशक्य होतं. दरम्यान नगरसेवक आणि स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे उन्मळून पडलेल्या झाडाला एक नवं घर सापडलं आहे. वांद्रे प्रोमेनेड येथे हे झाडं पुन्हा लावलं जाणार आहे.
हेही वाचा- परमबीर सिंग यांच्या अडचणीत भर, क्रिकेट सट्टेबाजानं केला 'हा' गंभीर आरोप
18 मे रोजी मुंबईला मुसळधार पाऊस आणि वाऱ्यानं झोडपून काढलं. त्यावेळी हे वडाचं झाड मुळापासून पडलं. यामुळे एका कारचं तसंच या झाडाला लागून असलेल्या इमारतीचा लोखंडी गेट आणि दुसऱ्या मजल्यावरील खिडकीची लोखंडी जाळीचं सुद्धा नुकसान झालं. या प्रकारामुळे हे झाडं पुन्हा त्याच ठिकाणी लावल्यास ते कोसळण्याची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आणि लवकरात लवकर त्या जागेवरुन हटवण्यास सांगितलं.
हेही वाचा- ''उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे'' मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेची विनंती
दरम्यान आता वांद्रे प्रोमेनेडमध्ये झाडासाठी 10 फूट रुंद आणि 5 ते 7 फूट खोल क्षेत्र खोदण्यात आले. सोमवारी 4 तासांच्या ऑपरेशननंतर झुकलेल्या झाडाचा वरचा भाग आणि थोड्या फार प्रमाणात फांद्या कापण्यात आल्या. झाडाच्या मुळावर तसंच फुटलेल्या भागांवर अँटी-फंगल लिक्विडची फवारणीही करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.