Elec-widget

तुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्या 50 पर्यटकांची अशी झाली सुटका

तुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्या 50 पर्यटकांची अशी झाली सुटका

तुंगारेश्वर येथे अचानक कोसळलेल्या पावसाने आज पुन्हा चिंचोटी धबधब्याची पुनरावृत्ती होण्यापासून वाचली आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 15 जुलै : तुंगारेश्वर येथे अचानक कोसळलेल्या पावसाने आज पुन्हा चिंचोटी धबधब्याची पुनरावृत्ती होण्यापासून वाचली आहे. रविवारची सुट्टी असल्याने आजही धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ५० पर्यटक अडकले होते मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने सर्व सुखरूप बाहेर आले.

उद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण?

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जागीच ठार

आजतागायत वसईच्या चिंचोटी, तुंगारेश्वर धबधब्यात बुडून अनेकांचे प्राण गेले आहेत. याठिकाणी पर्यटकांना बंदी घातली असताना सुद्धा अनेक अतिउत्साही लोक जीवाची मजा करण्यासाठी येतात आणि आपला जीव गमावून बसतात. आज पुन्हा चिंचोटी धबधब्याची पुनरावृत्ती होण्यापासून वाचली. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तुंगारेश्वर धबधब्यात पुन्हा 50 पर्यटक अडकले होते. मात्र, दोन तासानंतर पाणी कमी झाल्याने त्यांची सुखरूप सुटका झाली. सर्वांची सुखरूप सुटका झाल्यामुळे आज देखील काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या अशी माहिती समोर आली आहे.

मुंबईला उद्या दूधपुरवढा नाही? पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स

Loading...

खडकवासला भरले, उद्या पाणी सोडणार!

पावसाळा आला की धबधब्याखाली मनसोक्त भिजायचे आणि वर्षांसहल साजरी करायची याकडे पर्यटकांचा ओघ असतो. वसई तालुक्यातील तुंगारेश्वर आणि चिंचोटी धबधबे तर पर्यटकांचे खास आकर्षण! थोडी उसंत घेतल्यानंतर वसईमध्ये परत पावसाने धडाक्याने हजेरी लावल्याने या दोन्ही धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धबधबा आणि जंगलात सफारी यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करत असल्याने याठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था लावण्याची आवशकता आहे.

VIDEO : मोडक सागर व्होवरफ्लो, दोन दरवाजे उघडले

'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...