कोकणात जाण्यासाठी 5 हजारांची ई-पाससाठी लूट, नितेश राणेंचा शिवसेनेवर गंभीर आरोप

कोकणात जाण्यासाठी 5 हजारांची ई-पाससाठी लूट, नितेश राणेंचा शिवसेनेवर गंभीर आरोप

ज्या कोकणातल्या जनतेनं शिवसेनेला सगळं काही दिलं त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

  • Share this:

मुंबई,  25 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. राज्य सरकारने इतर जिल्ह्यात जाण्यास परवानगी दिल्यामुळे अनेक चाकरमानी कोकणाकडे निघाले आहे. जिल्हाबंदी असल्यामुळे ई-पास काढणे बंधनकारक आहे. परंतु, काही दलालांकडून ई-पाससाठी प्रत्येकी 5 हजार रुपये उकळले जात आहे, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी ई-पाससाठी एका महिलेसोबत मोबाईल संवादाचे ऑडिओ ट्वीट केले आहे. यामध्ये ही महिला ई-पास काढून देण्याची हमी देत आहे. आधार कार्ड, गाडीचा नंबर घेऊन ही महिला अवघ्या 3 तासात ई-पास काढून देते असल्याचं सांगत आहे. या पाससाठी प्रत्येकी 5 हजार रुपये दर मोजावा लागत आहे.

ज्या कोकणातल्या जनतेनं शिवसेनेला सगळं काही दिले त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या एजंटला कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली.

विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून ई-पास देण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातूनच ई-पास दिले जात आहे. असं असतानाही पैसे देऊन पास देण्याचा प्रकार घडत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे 70 वर्षांनंतर झाली ताटातूट, अखेर अशी झाली भेट! हा VIDEO पाहाच

दरम्यान,खारपाडा-रायगड, कशेडी-रत्नागिरी, खारेपाटण-सिंधुदुर्ग या ठिकाणी 10-10, 12-12  तास ताटकळत या चाकरमान्यांना थांबावं लागलं. सरकारमुळे या चाकरमान्यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

संपादन - सचिन साळवे

First published: May 25, 2020, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading