'मरीन ड्राइव्ह'वरून 5 अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

'मरीन ड्राइव्ह'वरून 5 अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

बेपत्ता असलेल्या विद्यार्थिनी कुलाब्यातील 'फोर्ट कॉन्व्हेंट स्कुल'च्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थीनी आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेबर : मरीन ड्राइव्ह वरून शनिवारी ५ अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या आहेत. कुलाब्यातील 'फोर्ट कॉन्व्हेंट स्कुल'मध्ये आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थीनी आहेत. निकालात गुण कमी मिळाल्याने त्या नाराज होत्या. मुलींच्या कुटुंबियांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस या पाचही मुलींचा शोध घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कुलाब्यातील 'फोर्ट कॉन्व्हेंट स्कुल'च्या या विद्यार्थिनी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहेत. नुकत्याच लागलेल्या शाळेच्या निकालात कमी गुण मिळाल्याने त्या नाराज होत्या आणि त्यामुळेच त्या बेपत्ता असल्याची शंका प्राथमिक स्तरावर व्यक्त केली जातेय.

या पाचही विद्यार्थिनींच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी शोधकार्य सुरू केलंय. या प्रकरणात इतर शंकांनाही वाव असल्यामुळे त्या दृष्टीकोनातुनही पोलीस तपास करीत आहेत.

 पॅनकार्डमध्ये झाले हे महत्त्वाचे बदल, तुम्ही पाहिलेत का

First published: September 1, 2018, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading