मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दोन महिलांसह पाच जणांचा जागेवरच मृत्यू

मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दोन महिलांसह पाच जणांचा जागेवरच मृत्यू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे.

पालघर, 27 जून: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष ,दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.  शुक्रवारी (26 जून) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तलासरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा...राज्यात यापुढे लॉकडाऊन नाहीच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पुण्यात मोठी घोषणा

मुंबईहून सुरतकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार डिव्हाडरवर आदळली. नंतर कार विरुद्ध वाहिनीवर जाऊन पलटी झाली. अपघात एवढा भीषण आहे की, कारमधील पाच जण जागेवरच ठार झाले आहेत.  कारने दोन-तिनदा पटली झाल्यानं कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. त्यामुळे गाडीमध्ये बसलेले चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकाच उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.  सदर सर्व राहणारे नालासोपारा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचे नातलग आल्यानंतरच त्यांची ओळख पटू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरातील हा दुसरा अपघात आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळ भरधाव कारनं तीन दुचाकींना उडवलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

वळसे (ता.सातारा) गावाजवळ सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राजेंद्र घाडगे (रा. समर्थगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारनं धडक देताच दुचाकीवर असलेले राजेंद्र घाडगे हे अक्षरश: चेंडू सारखे 25 ते 30 फूट उंच हवेत फेकले जाऊन जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा...कोरोनाशी झुंज सुरू असताना बहिणीने फोन केल्याचा आनंद- धनंजय मुंडे

दरम्यान,  राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता महामार्गावर वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच अलिकडे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे.

First published:

Tags: Ahmedabad car accident, Major Accident, Mumbai accident