Home /News /mumbai /

परमबीर सिंग यांच्यावर 5 गुन्हे तर IPS अधिकारी देवेन भारती यांच्याविरोधातही FIR दाखल

परमबीर सिंग यांच्यावर 5 गुन्हे तर IPS अधिकारी देवेन भारती यांच्याविरोधातही FIR दाखल


देवेन भारती हे सध्या राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी दीपक फटांगडे या दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

देवेन भारती हे सध्या राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी दीपक फटांगडे या दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

देवेन भारती हे सध्या राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी दीपक फटांगडे या दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

    मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सिंग यांच्यावर एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यातील एक मोठा आणि राजकारणात ज्या IPS अधिकाऱ्याचा दबदबा आहे त्या अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती ( FIR against IPS officer Deven Bharti) यांच्याविरोधात सुद्धा FIR दाखल करण्यात आला आहे. देवेन भारती हे सध्या राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी दीपक फटांगडे या दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी दिपक कुरुळकर यांनी हा गुन्हा दाखल केा आहे. 2017  मध्ये रेश्मा खान नावाच्या एका बांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी देवेन भारती यांनी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप तक्रारारदार दिपक कुरुळकर यांनी केला. २०१७ मध्ये विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून दीपक करूळकर हे कार्यरत असताना रेश्मा खान नावाच्या एका महिलेने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्या महिलेने दिलेले कागदपत्रे बनावट असल्याचा संशय कुरुळकर यांना आला होता. या करता त्यांनी महिलेचे कागदपत्र तपासण्याकरता संबंधीत संस्थांना संपर्क केला या संपर्क केलेल्या सर्व संस्थांनी अशा प्रकारे कोणतेच कागदपत्रे आम्ही दिले नाहीत असा अहवाल कुरुळकर यांना सादर केला आणि त्यांनी रेश्मा खान यांची चौकशी केली असता कागदपत्रांवरील पत्त्याची पडताळणी केली असता तिने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. ठाण्यात वडापाव सेंटरमध्ये गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतल्याने महिला गंभीर जखमी त्यानंतर करूळकर यांनी मालवणी पोलीस ठाण्याला याबाबत महिलेची चौकशी करून कारवाई करण्याबाबत कळवले. त्यावेळेस मालवणी पोलिस स्टेशनमध्ये दीपक फटांगडे हे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी करूळकर यांच्याकडून आलेल्या अर्जावर कुठलीही कारवाई करणारा नाही असे सांगून कुरुळकर यांनी पाठवेली तक्रार धुडकावून लावली. यानंतर करूळकर यांनी दीपक फटांगडे यांची भेट घेतली असता यात कोणतीच कारवाई करायची नाही असं वरिष्ठांनी म्हणजे तत्कालीन कायदा सु-व्यवस्था आयुक्त देवेन भारती यांनी सांगितलंय असं  फटांगडे यांनी कुरुळकर यांना सांगितले होते. त्यानंतर पोलिससह आयुक्त देवेन भारती यांनी करूळकर यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर पडताच कुरुळकर यांना सांगितले की “या प्रकरणात लक्ष घालू नकोस, यात मोठी राजकीय व्यक्ती आहे, तुला त्रास होईल” असा जबाब तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक करुळकर यांनी दिला. चिमुकली खेळत असतानाच अचानक समोर आला भलामोठा अजगर अन्...; धडकी भरवणारा VIDEO या प्रकरणी स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक संजय पाटील यांनी देखील लक्ष घातले असून तक्रारारदार दीपक कुरुळकर यांचा जबाब घेतला. यासोबत ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत त्या सर्वांचे जबाब नोंदवले गेले आणि नंतर या प्रकरणी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये १० डिसेंबर म्हणजेच शुक्रवारी FIR नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाने चौकशी केली असून या प्रकरणा संबंधी कागदपत्रांची मागणी  राज्य गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात आली होती. पण या प्रकरणातील सर्व कागदपत्रे नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस स्टेशनकडून देण्यात आली आहे. आता या प्रकरणाची चौकशी  मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या