मुंबई, 16 सप्टेंबर : 15 सप्टेंबर रोजी (काल) राज्यात 515 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब राज्याच्या आरोग्य विभागाने दिली होती. आज राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी आज राज्यात 23365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.
आज राज्यात 474 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.75 % इतका आहे. आज 17559 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण 792832 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.71 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5506276 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1121221 (20.36 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1753347 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 36462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 297125 इथपर्यंत पोहोचली आहे.
23,365 new #COVID19 cases and 474 deaths reported in Maharashtra today; 17,559 patients discharged. Total cases in the state rise to 11,21,221 including 30,883 deaths and 7,92,832 patients discharged. Active cases at 2,97,125: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/QiNePDBLFL
— ANI (@ANI) September 16, 2020
अहमदाबाद, नोएडा नंतर आता मुंबईमध्ये चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. कोरोनातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहून डॉक्टरी हैराण झाले आहे. कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर पुन्हा हा संसर्ग उलटून आला. नोएडा इथे दोन तर मुंबईतील चार रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा-BMC चा मोठा निर्णय : तुमच्या इमारतीतील कोरोना रुग्णसंख्येवरुन होणार कारवाई
सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देशात कोरोनानं 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 85 ते 95 हजार नवीन लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 50 लाख पार झाला आहे. आतापर्यंत 50 लाख 20 हजार 360 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.