मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यातील 42 हजार होमगार्ड वाऱ्यावर; सरकारकडून मानधन न मिळाल्यानं उपासमारीची वेळ

राज्यातील 42 हजार होमगार्ड वाऱ्यावर; सरकारकडून मानधन न मिळाल्यानं उपासमारीची वेळ

शहराच्या कडक बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच होमगार्ड्स (Homeguards) यांनाही दिवसरात्र राबावं लागत आहे. असं असतानाही मागील चार महिन्यांपासून संबंधित होमगार्ड्सना त्यांच्या हक्काचं मानधन (Remuneration) देण्यात आलं नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जुलै: मागील जवळपास दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी वेळोवेळी लॉकडाऊनची अमलबजावणी केली जात आहे. शहराच्या कडक बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच होमगार्ड्स (Homeguards) यांनाही दिवसरात्र राबावं लागत आहे. असं असतानाही मागील चार महिन्यांपासून संबंधित होमगार्ड्सना त्यांच्या हक्काचं मानधन (Remuneration) देण्यात आलं नाही. राज्यातील तब्बल 42 हजार होमगार्ड्सचं मानधन राज्य सरकारनं (State Government) थकवलं आहे. त्यामुळे अनेक होमगार्ड्सवर उपासमारीची (Starvation) वेळ आली आहे.

एप्रिल महिन्यापासून जुलैपर्यंत अशा एकूण चार महिन्यांचं मानधन थकलं आहे. विशेष म्हणजे महासमादेशक कार्यालयाकडे होमगार्ड्सना मानधन देण्यासाठी निधीच शिल्लक नाही. त्यामुळे राज्यातील 42 हजाराहून अधिक होमगार्ड्सच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधन न मिळूनही हे जवान विविध सण, उत्सव, निवडणुका, राजकीय सभा अशा कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. पण त्यांना त्यांच्या कामाचे पैसे देखील मिळत नाहीयेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

हेही वाचा-आज सुप्रीम कोर्टात ठरणार अनिल देशमुख यांचं भवितव्य

खरंतर, दोन वर्षांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका दिवसासाठी 300 रुपये मिळत होते. पण आता त्यांना एका दिवसासाठी 670 रुपये दिले जातात. प्रशासनाकडून होमगार्ड्सचं मानधन वाढवलं खरं पण त्यांना देण्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात करण्यात आली नव्हती. त्यामुळे सध्या महासमादेशक कार्यालयाकडे निधीचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला होमगार्ड्सचं मानधन थकवण्यात आलं होतं.

हेही वाचा-भारताचे आणखी एक मेडल नक्की! बॉक्सिंगमध्ये लवलीनाचा विजयी पंच

त्यामुळे होमगार्ड्स आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात होरपळ झाली होती. चार महिन्यांपूर्वी  सरकारने महासमादेशक विभागाला 55 कोटी  देऊन 2 महिन्यांचे मानधन देण्यात आलं होतं. संबंधित होमगार्डनी थकीत मानधनाची पर्वा न करता कोरोनाच्या कार्यकाळात सुरक्षारक्षकाची भूमिका जबाबदारीनं पार पाडली आहे. मात्र, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.

First published:

Tags: Maharashtra