मुंबईत डान्स बारमध्ये पोलिसांचा छापा, छुप्या खोलीतील 10 बारबालांची सुटका

मुंबईत डान्स बारमध्ये पोलिसांचा छापा, छुप्या खोलीतील 10 बारबालांची सुटका

बारबाला पोलिसांना दिसू नयेत, म्हणून त्यांना आतील एका छुप्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. परंतु पोलिसांनी शक्कल लढवत या छुप्या खोलीचा शोध घेतला.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : भाईंदरमधील एका मोठ्या डान्स बारमध्ये पोलिसांनी काल (सोमवार) रात्री उशिरा छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी छुप्या खोलीत लपवण्यात आलेल्या 10 बारबालांची सुटका केली आहे. तसंच डान्स बारमधील इतर 40 जणांना अटक केली.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी हा छापा टाकला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अश्लील नाच बघत असणाऱ्या 16  ग्राहकांचा समावेश आहे. तसंच या छापेमारीत बारच्या मॅनेजरसह कॅशिअर आणि स्टाफमधील लोकांना अटक केली आहे.

या डान्सबारमध्ये छापा टाकल्यानंतरही बारबाला पोलिसांना दिसू नयेत, म्हणून त्यांना आतील एका छुप्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. परंतु पोलिसांनी शक्कल लढवत या छुप्या खोलीचा शोध घेतला आणि आतमध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या 10 बारबालांची सुटका केली. या बारचा मालक नेमका कोण आहे, आणि कोणाच्या आशीर्वादाने हा बार सुरू होता, याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.

महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी असतानाही अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असतात. तसंच या ठिकाणी मुलींकडून गाण्यांवर अश्लील डान्स  करून घेतला जातो. तसंच या मुलींसोबत अनेकदा गैरप्रकार होत असतात. पोलिसांकडून आता अनेक ठिकाणी छापे टाकत कारवाई केली जात आहे. येणाऱ्या काळात बारमाफियांचं जाळं उद्धवस्त करण्याचा पोलिसांच्या प्रयत्नांना यश येणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल.

 VIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का?

First published: October 23, 2018, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading