अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; उद्यापासून प्रवास अधिक सुखकर

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; उद्यापासून प्रवास अधिक सुखकर

यामुळे रेल्वेतील गर्दी कमी होण्यास मदत होईल

  • Share this:

मुंबई, 28 जून : मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने लोकल सेवा सुरू केली आहे. हळूहळू लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील गर्दीचे वृत्त समोर येत होते. या गर्दीमुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अवघड जात होते. मात्र यावर पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर 40 अतिरिक्त सेवा वाढविण्यात आल्या आहे. 29 जून म्हणजे उद्यापासून या 40 अतिरिक्त सेवा पश्चिम रेल्वेअंतर्गत सुरू होती. त्यानुसार आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्या 202 पर्यंत पोहोचला आहे.

- चर्चगेट ते बोरीवलीदरम्यान 20 धीम्या लोकल (10 अप आणि 10 डाऊन मार्गावर)

- बोरीवली ते वसई रोड दरम्यान 2 लोकल धीम्या मार्गावर

- वसई ते चर्चगेट दरम्यान 2 जलद लोकल (अप मार्गावर)

- विरार ते बोरीवली दरम्यान 2 धीम्या लोकल (अप मार्गावर)

- चर्चगेट ते विरारदरम्यान 14 जलद लोकल (8 डाऊन मार्गावर व 6 अप मार्गावर)

दरम्यान कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुंबई जवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.  ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

 

First published: June 28, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading