मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लहान मुलांवर लक्ष ठेवा, मुंबईतील 4 वर्षाच्या चिमुरड्याचा धक्कादायक VIDEO पाहाच!

लहान मुलांवर लक्ष ठेवा, मुंबईतील 4 वर्षाच्या चिमुरड्याचा धक्कादायक VIDEO पाहाच!

इतर मुलांनी पाहून आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक जमा झाले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं

इतर मुलांनी पाहून आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक जमा झाले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं

इतर मुलांनी पाहून आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक जमा झाले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं

  • Published by:  sachin Salve

मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

गोवंडी, 10 मार्च :  तुमची लहान मुलं कुठे खेळत आहे आणि काय करत आहे, यावर लक्ष देण्याची जबाबदारी पालकांवर असते. पण, यात थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर आपल्या पाल्याचा जीव धोक्यात जाऊ शकतो, असा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील गोवंडीमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरड्याचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईतल्या गोवंडी भागातील शिवाजी नगरमध्ये 4  वर्षांचा मुलगा शौचालयाच्या टाकीत पडून मृत पावला. आज संध्याकाळी सव्वा 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.  अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आरिफ नसुल्लाह शेख (वय 4) हा काही मुलांसह घरासमोर खेळत होता. खेळत खेळत इतर मुलांना सोडून हा मूळ शौचालयाच्या टाकीजवळ पोहोचला. या टाकीत  उघड्या जागेवर लाकडी फळीचं झाकण ठेवण्यात आलं होतं. हा मुलगा त्यावर गेला असता झाकण उलटलं आणि हा मुलगा त्यात पडला.

इतर मुलांनी पाहून आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक जमा झाले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले.

आरिफला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शिवाजी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

कुत्र्याने चावा घेतल्यामुळे चिमुरड्याचा करूण अंत

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील एका साडेतीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने चावल्यामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 7 मार्च रोजी घडली. वेदांत मालखेडे असं या मुलाचं नाव आहे. २१ फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांतच्या चेहऱ्यावर चावा घेतला होता. तब्बल १६ दिवस जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, आज वेदांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरातील जळगाव रोडवरील जुना सतारा भागातील रहिवासी असलेले अनिल मालखेडे यांना एक मुलगा वेदांत आणि एक मुलगी वैष्णवी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी (दि. २१ फेब्रुवारी) सकाळी वेदांत घराच्या ओट्यावर आजी सुमनबाई यांच्या सोबत बसला होता. त्याचवेळी अचानक एक पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांत याच्यावर हल्ला चढवला. या कुत्र्याने वेदांतच्या चेहऱ्याला भीषण चावा घेतला होता. अचानक झालेल्या या प्रकाराने लहानगा वेदांत आणि आजी भांबावून गेले. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली.

वेदांत याला तात्काळ पालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आलं. तिथं चेहऱ्यावरील जखमांवर इलाज करून त्यास रॅबिज आणि टीटीचे इग्जेक्शन दिलं. वेदांत याच्या गालावर सात जखमा झाल्या होत्या. गालावरील जखमा खोलवर असल्याने वेदांतला मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता, असं त्याचे वडील अनिल मालखेडे यांनी सागितलं.

मुलावर पालिका दवाखान्यात उपचार करून त्यांनी जळगाव येथील जिल्हा मेडीकल कॉलेज व जिल्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळाला जळगाव इथं दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्या गालावर इंजेक्शन दिले. तेथून परत वेदांतला भुसावळ इथं आणले आणि पालिकेच्या दवाखान्यात २४, २८ फेब्रुवारी आणि तीन मार्चला असे रॅबिजचे इंजेक्शन दिले.

मुलांची प्रकृती पाहिजे तशी ठीक होत नसल्याने त्यास शहरातील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, त्या दवाखान्यात वेदांतला न तपासताच त्याला जळगाव इथं एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तेथील डॉक्टरांनी सुद्धा न पहाता तेथिल असिस्टन डॉक्टरांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

वेदांतवर जिल्हा रूग्णालयात उपचार होत असतांना

इतर मुलांनी पाहून आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक जमा झाले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवलं

आमच्याकडे ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर नसल्यानं आपण बाळाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. बाळाला बरे वाटेल म्हणून वेदांतच्या वडिलांनी त्याला डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु, आज वेदांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वेदांतवर 16 दिवस उपचार झाला पण आज या चिमुरड्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या वेदांतच्या मृत्यूमुळे मालखेडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

First published:

Tags: Cctv, Video, Viral video.