युनेस्कोच्या हेरिटेज पुरस्कारात मुंबईतील चार स्थळं

त्यापैकी ४ स्थळं मुंबईतली आहेत. त्यामध्ये चर्नीरोडचे ऑपेरा हाऊस, वेलिंग्टन फाऊंटन, वाडीया फाऊंटन अॅंड क्लॉक टॉवर आणि भायखळ्याच्या ख्रिस्त चर्चचा समावेश आहे. या चारही जागा मुंबईतील अत्यंत जुन्या आणि मानाच्या जागा आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2017 04:38 PM IST

युनेस्कोच्या हेरिटेज पुरस्कारात मुंबईतील चार स्थळं

मुंबई,03 नोव्हेंबर:  युनेस्कोने दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या स्मारकांच्या पुरस्काराची घोषण केली आहे. त्यात भारतातल्या ७ स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी ४ स्थळं मुंबईतली आहेत. त्यामध्ये चर्नीरोडचे ऑपेरा हाऊस, वेलिंग्टन फाऊंटन, वाडीया फाऊंटन अॅंड क्लॉक टॉवर आणि भायखळ्याच्या ख्रिस्त चर्चचा समावेश आहे. या चारही जागा मुंबईतील अत्यंत जुन्या आणि मानाच्या जागा आहेत.

1. रॉयल ऑपेरा हाऊस 

पाश्चिमात्य जगात ऑपेरा हाऊसची प्रसिद्ध आहेत. भारतातले 100 वर्ष जुने आणि एकमेव ऑपेरा हाऊस आहे.हे ऑपेरा हाऊस गेले 23 वर्ष  बंद होते. महात्मा गांधी, लता मंगेशकर,यांनी या ऑपेरा हाऊसने गुरूदत्तच्या सिनेमांचा सुवर्ण काळही पाहिला आहे.ब्रिटीश स्थाप्त्यकलेच्या खूणा अजूनही या  ऑपेरा हाऊसवर दिसत आहेत.

2.वेलिंग्टन फाऊन्टेन 

मुंबईतल्या अनेक सुंदर कारंज्यापैकी एक म्हणजे वेलिंगटन फाऊन्टेन. सुमारे 150 वर्षांपूर्वी वेलिंग्टनच्या ड्युक्च्या स्मरणार्थ हा फाऊन्टेन बनवण्यात आला होता. हा फाऊन्टेन आज बरेच लोक रीगल सर्कलमध्ये उभा आहे.

Loading...

 

3.वाडिया फाऊन्टेन आणि क्लॉक टॉवर 

1880च्या दशकात ही वास्तू बनवण्यात आली आहे.बोमोनजी वाडिया यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बनवण्यात आली होती.या वास्तूवर पारश्यांसाठी पवित्र अशा अग्निचे चित्र देखील आहे.

4.भायखळ्याचा ख्रिस्त चर्च 

150वर्षाहून जुना हा चर्च आजही गतवैभवाची साक्ष देतो आहे. हा चर्च मुंबईचे गव्हर्नर असलेल्या एल्फिन्स्टननी बनवला होता. मुंबईत इंग्रजांना प्रार्थना करता यावी म्हणून हा चर्च बनवण्यात आला होता. आजही इथे दर रविवारी अजूनही प्रार्थना केली जाते.

 

या चारही जागांना हा पुरस्कार मिळणं ही मुंबईकरांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...