Home /News /mumbai /

फडणवीस यांच्यासोबत 5 जण घेणार शपथ, नावं आली समोर, एकनाथ शिंदे पोहोचले मुंबईत!

फडणवीस यांच्यासोबत 5 जण घेणार शपथ, नावं आली समोर, एकनाथ शिंदे पोहोचले मुंबईत!

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजेच्या सुमारास राजभवनावर जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजेच्या सुमारास राजभवनावर जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजेच्या सुमारास राजभवनावर जाणार आहे.

    मुंबई, ३० जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (uddhav thackeray resigns as cm) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार (devendra fadanvis) स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे (eknath shinde) आजच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर आज किंवा उद्या फडणवीस यांच्यासह ५ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३ः३० वाजेच्या सुमारास राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी किंवा उद्या शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतर आणखी ५ नेते हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे चार नेते भाजपकडून शपथ घेणार आहे. तर एकनाथ शिंदे सुद्धा शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान,पत्रकारांशी बोलत असताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही. जी काही परिस्थिती उद्भवली होती, जे आमदार आमच्यासोबत आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जे काही वाईट अनुभव होते. त्याबद्दल त्यांना सांगितले होते. त्यांनी जर आधी निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यांनी राजीनामा दिला त्याचा आम्हाला बिल्कुल आनंद नाही. त्यांच्याबद्दल कालही आदर होता आणि आज आदर आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले, मी शिवसेनेचा नेते आहे. आमच्याकडे ५० आमदारांचे पाठबळ आहे. सरकार स्थापनेची जी काही प्रक्रिया आहे त्याचे अधिकारी मला आमदारांनी दिले आहे. मी मुंबईमध्ये चाललो आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय होणार आहे. राज्यपाल महोदय यांना भेटणार आहे. त्या भेटीनंतर आमची पुढील रणनीती ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.
    First published:

    पुढील बातम्या