डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

डॉ. अमरापुरकर यांचा एलिफिन्स्टन रोड परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घरात पाणी शिरतं म्हणून स्थानिक रहिवाश्यांनीच हे मॅनहोल उघडं ठेवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

  • Share this:

मुंबई,18सप्टेंबर: डॉ. अमरापुरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 29 ऑगस्टला मॅनहोलमध्ये पडून अमरापुरकर यांचा मृत्यू झाला होता.

29 ऑगस्टला मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर रस्त्याने चालणाऱ्या डॉ. अमरापुरकर यांचा एलिफिन्स्टन रोड परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घरात पाणी शिरतं म्हणून स्थानिक रहिवाश्यांनीच हे मॅनहोल उघडं ठेवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या प्रकरणी चार स्थानिक रहिवाश्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

2005 पासून महापालिका जिथेही पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मॅनहोल उघडते तिथे देखरेखीसाठी  माणसं ठेवते असा महापालिकेचा दावा आहे. घटनास्थळी मात्र अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. तपास केल्यानंतर स्थानिकांनी मॅनहोल उघडं ठेवल्याची माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 10:29 AM IST

ताज्या बातम्या