बनावटगिरीचा कहर, बँकेतून आपल्याच खात्यात ट्रान्सफर केले तब्बल 4 कोटी 10 लाख!

बनावटगिरीचा कहर, बँकेतून आपल्याच खात्यात ट्रान्सफर केले तब्बल 4 कोटी 10 लाख!

पनवेलमध्ये आयसीआयसीआय बँकेला तब्बल 4 कोटी 10 लाख रुपयांना फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

पनवेल, 13 फेब्रुवारी : पनवेलमध्ये आयसीआयसीआय बँकेला तब्बल 4 कोटी 10 लाख रुपयांना फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका महाठगाने बनावट कागदपत्रं तयार करून बँकेतील दुसऱ्या एका खात्यातून तब्बल 4 कोटींची रक्कम आपल्या खात्यात वळवली होती. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

घडलेली हकीकत अशी की, पनवेल येथील ICICI बँकेत हा प्रकार घडला आहे. एका अनोळखी इसमाने हर्बल लाईफ इंटरनॅशनल प्रा.लि या कंपनीचे बनावट लेटरहेड आणि  कंपनीचे बनावट रबरी स्टॅम्प मारून, खोट्या सह्या करून कंपनीच्या नावाने बँकेत असलेल्या खात्याचा मोबाईल क्रमांक बदली केला.

त्यानंतर बनावट लेटरहेड बँकेत देऊन बनावट चेकद्वारे या कंपनीच्या खात्यात असलेली 4 कोटी 10 लाख रुपये रक्कम आर के एंटरप्राइज नावाच्या खात्यात जमा केली. परंतु, आयसीआयसीआय बॅंकेच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला.

बँकेतला कर्मचारी होता सहभागी

या प्रकरणामध्ये बँकेतील कर्मचारीच सहभागी असल्याचं पुढे आलं आहे. या कर्मचाऱ्याने  आरोपीला बँकेच्या खात्याबाबत सर्व गोपनीय माहिती दिली होती. त्यामुळेच चोरीचा प्रकार घडला. या प्रकरणी या कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.  त्याने दिलेल्या माहितीवरून 6 आरोपींना अटक केली. तसंच आर के एंटरप्राइज या खात्यात ट्रान्सफर केलेल्या  4 कोटी 10 लाख रुपये रक्कमेपैकी 4 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची उकल केल्यामुळे इंडसइंड बँकेत फ्रीज करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

दरम्यान, पुण्यातल्या एका ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी आलेली एक अभिनेत्री चक्क चोरटी निघाल्याची घटना घडली आहे. शहरातला पॉश समजल्या जाणाऱ्या कॅम्प भागातल्या एका मॉलमध्ये ही अभिनेत्री ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी आली होती. आपल्याला अंगठ्या घ्यायच्या आहेत, असं तिने दुकानदाराला सांगितलं होतं. त्यानंतर दुकानदाराने तिला अंगठ्या दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी तिने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दोन अंगठ्या चोरल्या. स्नेहलता पाटील असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे.

स्नेहलता या दुकानात गेल्यानंतर त्यांनी खूप प्रकारच्या अंगठ्या पाहिल्यात. त्यानंतर त्या दुकानादाराला आणखी नवे प्रकार दाखवा, असं सांगत होत्या. चोखंदळ ग्राहक दिसते असं समजून ते जेव्हा नव्या डिझाइनच्या अंगठ्या आणायला गेले. त्याचवेळी तिने दोन अंगठ्या चोरल्या. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला.

दुकानदाराला हा प्रकार समजताच त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली. याबाबत लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजबघून स्नेहलता पाटीलला अटक करण्यात आली. 50 हजार रुपये एवढी या अंगठ्यांची किंमत आहे. स्नेहलताने एका हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2020 10:15 PM IST

ताज्या बातम्या