मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात तब्बल 36 हजार 992 कोटींची वीज बिल थकबाकी

भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात तब्बल 36 हजार 992 कोटींची वीज बिल थकबाकी

 भाजपचे सरकार (BJP Goverment) आल्यानंतर पाच वर्षात थकबाकीचा आकडा हा तब्बल  36, 992 कोटींवर पोहोचला. तर 1 एप्रिल ते 30 ऑक्टोबर या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात 8 हजार कोटींची वीज बिल थकबाकी वाढली आहे.

भाजपचे सरकार (BJP Goverment) आल्यानंतर पाच वर्षात थकबाकीचा आकडा हा तब्बल 36, 992 कोटींवर पोहोचला. तर 1 एप्रिल ते 30 ऑक्टोबर या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात 8 हजार कोटींची वीज बिल थकबाकी वाढली आहे.

भाजपचे सरकार (BJP Goverment) आल्यानंतर पाच वर्षात थकबाकीचा आकडा हा तब्बल 36, 992 कोटींवर पोहोचला. तर 1 एप्रिल ते 30 ऑक्टोबर या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात 8 हजार कोटींची वीज बिल थकबाकी वाढली आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 19 नोव्हेंबर : लॉकडाउनच्या (Lockdown) काळात भरमसाठ आलेल्या वीज बिलावरून (electricity bill) ठाकरे सरकार (mva government) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगला आहे. राज्याभरात भाजपच्या नेत्यांकडून महावितरण कार्यालयावर आंदोलनं मोर्चे काढले जात आहे. पण, भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात 36, 992 कोटी वीज बिल थकबाकी झाली, अशी माहिती समोर आली आहे. 2014 साली राज्यात सत्ता परिवर्तन होऊन भाजप आणि शिवसेनेचं सरकार आले. त्यावेळी 2014 साली 14,154.50 कोटी एवढी थकबाकी होती. पण, त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर पाच वर्षात थकबाकीचा आकडा हा तब्बल  36, 992 कोटींवर पोहोचला असे वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.  त्यामुळे राज्यात वीज बिलाची थकबाकी ही 51,146.50 कोटींवर पोहोचली आहे. मित्राच्या मदतीनं ड्रायव्हरनं पळवली 4 कोटींच्या रोकडसह एटीएम व्हॅन, अखेर... तसंच, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाची लाट आली. त्यामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. 1 एप्रिल ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 8 हजार कोटींची थकबाकी वाढली आहे. या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे वीज मिटरची नोंद करण्यात आला नाही. मात्र, या काळात सरासरी वीज बिल देण्यात आले होते. त्यानंतर एकत्र आलेल्या वीज बिलात भरमासाठ वाढ झाल्याचे आढळून आले. राज्यात वीज थकबाकीचा आकडा वाढल्यामुळे वीज मंडळासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला असून अस्तित्वच धोक्यात आले आहे.  जर सरकारने यावर तोडगा काढला नाहीतर भविष्यात राज्यात मोठे वीज संकट उभे राहील, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. संजय राऊतांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली, प्रवीण दरेकरांनी केला पलटवार तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही तर आम्ही त्यांच्या वीज पुरवठा खंडित करणार नाही, अशी घोषणा केली होती.  त्यांच्या या निर्णयामुळे 25 ते 30 टक्के कृषी पंपाची वीज बिलाची वसुली त्यानंतर पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर 10 हजार कोटींचा भार पडला होता. 10 हजार कोटींची असलेली थकबाकी आता 40 हजार कोटींवर पोहोचली आहे. राज्यात कृषी क्षेत्राची थकबाकी मार्च 2020 मध्ये 40,185 कोटींच्या घरात पोहोचली आहे. घरगुती आणि अन्य छोटे उद्योग, हातमाग, पथदिवे, कृषी, सार्वजनिक सेवा, अशा उपक्रमांना लघुदाब गटात ठेवले आहे. लॉकडाउनच्या 8 महिन्याच्या काळात थकबाकीची रक्कम ही 3450 कोटींवर पोहोचली आहे. बसमध्ये ओळख झालेल्या महिलेने 4 महिन्याचे बाळ पळवले, पुण्यातील खळबळजनक घटना जुनी थकबाकी वाढतच चालली आहे. आणि नवीन बिलांची वसुली थांबली आहे. त्यामुळे वीज मंडळासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर उद्या वीज मंडळाला कुलूप ठोकावे लागेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, महावितरण कंपनीकडे  आता राज्यभरात सरकारी मालकीची जागा शहरात सुद्धा आहे. त्यामुळे ही जागा विकून पैसे उभे करण्याशिवाय मंडळाकडे पर्याय उरलेला नाही, उद्या असा निर्णय घेण्याची सुद्धा वेळ येऊ शकते, असंही वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
First published:

Tags: महावितरण

पुढील बातम्या