मराठी न्यूज इंडस्ट्रीत पहिल्यांदाच राज ठाकरेंचा मोर्चा ३६० डिग्री कॅमेऱ्यात कैद

आयबीएन लोकमतच्या वेब टीमने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोर्चा ३६० डिग्री अँगलमध्ये कव्हर केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2017 03:13 PM IST

मराठी न्यूज इंडस्ट्रीत पहिल्यांदाच राज ठाकरेंचा मोर्चा ३६० डिग्री कॅमेऱ्यात कैद

सचिन साळवे, 06 आॅक्टोबर : आजपर्यंत ड्रोनच्या नजरेतून मराठा मोर्चा सर्वांनी पाहिला  असेल. पण मराठी न्यूज इंडस्ट्रीत पहिल्यांदाच एखादा मोर्चा हा ३६० डिग्री कमेऱ्यात कैद झालाय. आयबीएन लोकमतच्या वेब टीमने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोर्चा ३६० डिग्री अँगलमध्ये कव्हर केला.

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेच्या निषेधार्थ मनसेचा संताप मोर्चा  मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशनपर्यंत निघाला होता.  या मोर्चाला अभूतपूर्व गर्दी झाली होती. मेट्रो सिनेमा ते चर्चगेट परिसरात मनसे सैनिकांचा जनसागर उसळला होता. हाच जनसागर आयबीएन लोकमतच्या वेब टीमने ३६० डिग्री अँगलमध्ये कमेऱ्यात कैद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...