मुंबई, 01 मार्च : महाराष्ट्रापुढे (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) संकट उभे ठाकले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (maharashtra budget session 2021) सुरुवात होण्याआधीच 32 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये विधान भवनाचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींचा सुद्धा सुमावेश आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक होते आजपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी साधारणपणे 3 हजारपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या. त्यात मंत्रालय विधिमंडळ कर्मचारी तसंच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यम आमदार यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार तीन हजार पैकी 32 लोकं पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यात विधिमंडळ मंत्रालय कर्मचारी तसंच पोलीस सुरक्षारक्षक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्या आमदारांनी विधान भवनामध्ये टेस्ट केल्या होत्या त्या बहुतेक निगेटिव्ह आल्याची माहिती विधानभवन करून देण्यात आली आहे. पण बऱ्याच आमदारांनी आणि मंत्र्यांनी खाजगी लॅब मधून टेस्ट केल्या आहेत. त्यांचे रिपोर्ट अद्यापी आली नाही, अशी माहिती विधान भवनाकडून देण्यात आली आहे.
ज्या लोकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशांना तात्काळ स्वतंत्र विलगीकरणात जाण्यास सांगितले असून लक्षणं आढळत असल्यास रुग्णालयात दाखल करण्याची सूचना देखील देण्यात आल्याची माहिती विधानभवनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवनात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस सरकारांनी उभारलेले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. यासोबतच पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावून जनतेची लूट सुरू आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढवल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
अनेकांना मोठ्या वेतनकपातीचा सामना करावा लागतो आहे. छोटे व्यापारी, लघु व मध्यम बंद झाल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच इंधन आणि गॅस दरवाढीमुळे या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. डिसेंबरपासून आजपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत गॅस सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची वाढ केली आहे. 800 रुपयांचे सिलेंडर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, मोठ्या प्रमाणात इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी असून केंद्रातील भाजप सरकारने ती थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्री व आमदार सायकलने प्रवास करून विधानभवनात पोहोचणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.