३१ टक्के मुंबईकरांना मनोविकार, महापालिकेचा चिंताजनक अहवाल

त्या खालोखाल सुमारे २३ टक्के मुंबईकरांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे आढळून आलंय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 17, 2018 11:28 AM IST

३१ टक्के मुंबईकरांना मनोविकार, महापालिकेचा चिंताजनक अहवाल

17 एप्रिल : बातमी आहे मुंबईकरांच्या आरोग्यासंदर्भातील. 31 टक्के मुंबईकरांना मनोविकारांशी संबंधित आजार असल्याचं समोर आलंय. महापालिकेच्या रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये जाऊन गेल्या दोन वर्षांत केलेल्या अभ्यास विश्लेषणात हे स्पष्ट झालंय. त्या खालोखाल सुमारे २३ टक्के मुंबईकरांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे आढळून आलंय.

त्यानंतर, रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार अनुक्रमे प्राणी दंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, अनोळखी ताप, जुलाब आणि मलेरिया या आजारांचा समावेश आहे. महापालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १५ उपनगरीय रुग्णालये आणि १७५ दवाखान्यांमध्ये जाऊन ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीचा केलेल्या अभ्यासाचा अहवालात समावेश आहे.

मुंबईकरांनो आरोग्याला जपा

- दोन वर्षांतील रुग्णांवर महापालिकेचा अहवाल

- केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांतील रुग्णांचा अभ्यास

- ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 दरम्यान अभ्यास

- एकूण रुग्ण - 5,59,954 रुग्णांची पाहणी

रुग्णसंख्या टक्केवारीत

- मनोविकार - 31.14

- मधुमेह - 23.22

- रक्तदाब -22.78

- श्वान/प्राणी दंश - 9.95

- हृदयविकार - 7.49

- डेंग्यू - 1.5

- दमा - 1.4

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close