पालकानों सावधान! चॉकलेट घशात अडकल्यानं चिमुकलीचा मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना

Death in Bhiwandi: चॉकलेट हा लहान मुलांचा जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या लेकरांना चॉकलेट देऊन लाड पुरवत असतात. पण पालकांनी दिलेलं चॉकलेट एका चिमुकलीच्या जीवावर बेतलं आहे.

Death in Bhiwandi: चॉकलेट हा लहान मुलांचा जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या लेकरांना चॉकलेट देऊन लाड पुरवत असतात. पण पालकांनी दिलेलं चॉकलेट एका चिमुकलीच्या जीवावर बेतलं आहे.

  • Share this:
    भिंवडी, 15 जून: चॉकलेट हा लहान मुलांचा जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या लेकरांना चॉकलेट देऊन लाड पुरवत असतात. पण पालकांनी दिलेलं चॉकलेट एका चिमुकलीच्या जीवावर बेतलं आहे. भिवंडी तालुक्यातील शेलार गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका साडेतीन वर्षाच्या मुलीचा चॉकलेट घशात (chocolate chocked in throat) अडकून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वीरा रोशन वारघडे असं मृत्यू झालेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. तिला घरच्यांनी काल एक चॉकलेट खायला दिलं होतं. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण चॉकलेट खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात वीरा अत्यवस्थ होऊ लागली. घशात चॉकलेट अडकल्यानं तिचा श्वास गुदमरू लागला. मुलीची ही अवस्था पाहून घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत चिमूकलीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेनं शेलार गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यातून अपहरण झालेली चिमुकली सापडली, तपासात धक्कादायक बाब उघड दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातून (Pune Crime) बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी सापडल्यानंतर एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. शनिवारी कात्रज (Katraj) येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी रविवारी पुणे रेल्वे स्थानकात सापडली. धक्कादायक म्हणजे, या मुलीला भीक मागायला लावायच्या उद्देशानं तिचं अपहरण करण्यात आलं होतं. पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपहरणाप्रकरणी सर्जेराव उमाजी बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे. हे ही वाचा-शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपूरातील 25 वर्षीय नराधमाला अटक शनिवारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानं मुलीच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पालकांच्या तक्रारीच्या आधारावर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होती. तसंच पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंर सोशल मीडियावरही मॅसेज देखील पाठवला होता. हे ही वाचा-नात्यातील तरुणासोबत बहिणीचं प्रेम नाही बघवलं, सख्ख्या भावनं गळा आवळून घेतला जीव रविवारी सकाळी रेल्वे स्थानकात एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी एका व्यक्तीसोबत दिसली. जवानाला संशय आल्यानं त्या व्यक्तीला आणि मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर अपहरणाचा घडलेला सर्व प्रकार समोर आला.
    Published by:News18 Desk
    First published: